Advertisement

स्पाच्या नावाखाली अंधेरीत देहविक्री, विदेशी मुलींचा सहभाग

देहविक्री रॅकेटचा वांद्रे आणि कांदिवली युनिटच्या गुन्हे शाखा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १२ मुलींची मुक्तता केली आहे. त्यात सहा विदेशी म्हणजेच थायलंडच्या मुलींचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

स्पाच्या नावाखाली अंधेरीत देहविक्री, विदेशी मुलींचा सहभाग
SHARES

स्पाच्या नावाखाली पश्चिम उपनगरात सुरू असलेल्या देहविक्री रॅकेटचा वांद्रे आणि कांदिवली युनिटच्या गुन्हे शाखा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १२ मुलींची मुक्तता केली आहे. त्यात सहा विदेशी म्हणजेच थायलंडच्या मुलींचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका महिलेसह स्पा चालवणाऱ्या मॅनेजरला आणि इतर दोघांना अटक केली आहे


टुरिस्ट व्हिजावर भारतात

विलेपार्लेच्या दीक्षीत रोडवरील रिशी इमारतीच्या तळ मजल्यावर दी थाई विला नावाने स्पा सेंटर सुरू करण्यात आलं होतं. मात्र स्पाच्या नावाखाली त्या ठिकाणी सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती वांद्रे गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार प्रभारी पोलिस निरीक्षक आशा कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी स्पा सेंटरवर कारवाई केली.  त्यावेळी पोलिसांनी स्पा सेंटरमध्ये ६ थायलंडच्या महिला आढळून आल्या. या सहाही महिला टुरिस्ट व्हिजावर भारतात आल्या होत्या. अधिक चौकशीत स्पाच्या नावाखाली सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. तर  दुसरीकडे बोरिवलीतील बाटा शोरूमजवळ फूल बाॅडी मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू होता. याची कूणकूण गुन्हे शाखा ११ च्या पोलिसांना लागली.


रोकड हस्तगत 

पोलिसांनी शहानिशा केली असता त्या ठिकाणी मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू होता. प्रत्येकी एका तासामागे हे मसाजवाले १० ते १५ हजार रुपये ग्राहकांकडून उकळत होते. त्यानुसार पोलिसांनी त्या मसाज सेंटरवर कारवाई केली असता तेथे ६ मुली आढळून आल्या. पोलिसांनी या मसाज सेंटरमधून सव्वा लाख रुपयांची रोकड हस्तगत केली.हेही वाचा -

वाहतूक पोलिसांनांच बांबू! बेशिस्त वाहन चालकांनी थकवला ४० लाखांचा दंड

३० वर्षांनंतर गुन्हा समोर आला, निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची नकळत कबुली
संबंधित विषय
Advertisement