३० वर्षांनंतर गुन्हा समोर आला, निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची नकळत कबुली

३० वर्षापूर्वी पोलिस कोठडीत आरोपीचा मारहाणीत मृत्यू झाला होता. मात्र आरोपी आजारी असल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव रचल्याची कबूली का निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने दिली.

SHARE

३० वर्षापूर्वी पोलिस कोठडीत आरोपीचा मारहाणीत मृत्यू झाला होता. मात्र आरोपी आजारी असल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव रचल्याची कबूली एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने दिली. या निवृत्त अधिकाऱ्याचं सर्व रेकाँर्डिंग सीसीटिव्हीत कैद झालं असून ३० वर्षानंतर आता या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखा १ कडून केली जात आहे.


तक्रारदार राजेंद्र ठक्कर यांच्या मालाड येथील कार्यालयात हा निवृत्त पोलिस अधिकारी १५ आॅक्टोंबर २०१८ साली आला होता. त्याच्यासोबत एका पोलिस अधिकारीही होता. त्यावेळी निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने ठक्कर, त्याचे मित्र आणि पोलिस अधिकाऱ्यासमोर एका आरोपीची मारहाणीत हत्या झाल्यानंतर ती हत्या नसून अपघाती मृत्यू असल्याचं दाखवत गुन्ह्यावर कशा प्रकारे पांघरून घातलं, याची कहाणी ठक्कर यांना सांगितली. त्या निवृत्त अधिकाऱ्याचा हा सर्व व्हिडिओ ठक्कर यांच्या कार्यालयातील सीसीटिव्हीत कैद झाला.हेही वाचा -

मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वेसेवा शुक्रवारपासून पूर्ववत

महापौरांनी विनयभंग केलाच नाही, 'त्या' महिलेने केला खुलासा!संबंधित विषय
ताज्या बातम्या