मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वेसेवा शुक्रवारपासून पूर्ववत

मुंबई-पुणे मार्गावर रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवासांसाठी खूशखबर आहे. मागील अनेक दिवसांपासून घाट परिसरात कोसळलेल्या दरडीमुळं बंद असलेली रेल्वे सेवा शुक्रवारपासून पूर्वरत झाली आहे.

मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वेसेवा शुक्रवारपासून पूर्ववत
SHARES

मुंबई-पुणे मार्गावर रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवासांसाठी खूशखबर आहे. मागील अनेक दिवसांपासून घाट परिसरात कोसळलेल्या दरडीमुळं बंद असलेली रेल्वे सेवा शुक्रवारपासून पूर्वरत झाली आहे. मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस आणि मुंबई पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्या आजपासून धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनानं दिली. मुसळधार पावसामुळं या मार्गावरील घाट परिसरात दरड कोसळली होती. त्यामुळं अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.

विशेष ब्लॉक घेऊन कामं

मुंबईसह राज्यभरात जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळं मध्य रेल्वेवरील कर्जत-लोणावळादरम्यान घाट क्षेत्रात दरड कोसळण्याली होती. त्यामुळं या स्थानकांदरम्यान २६ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत विशेष ब्लॉक घेऊन कामं करण्यासाठी नियोजन करण्यात आलं होतं. परंतु, २ ऑगस्टपासून पुन्हा पडलेल्या मुसळधार पावसामुळं कर्जत ते लोणावळा भागांत ३ ठिकाणी दरड कोसळून, पाणी साचून मोठा फटका बसल्यानं ३ ऑगस्टपासून मुंबई ते पुणे मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता या मार्गाच्या दुरूस्तीचं काम पुर्ण झालं आहे. त्यामुळं मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

अनेक गाड्या रद्द

मुसळधार पावासामुळं रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्यानं तसंच दरड कोसळल्यामुळं लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळं प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते. त्याशिवाय पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी, इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्याही ११ ऑगस्टपर्यंत रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर १६ ऑगस्टपर्यंत रद्द ठेवण्याचा निर्णय दुसऱ्याच दिवशी घेण्यात आला होता.हेही वाचा -

गणेश मंडळांसाठी समन्वय समितीची आचारसंहितासंबंधित विषय