महापौरांनी विनयभंग केलाच नाही, 'त्या' महिलेने केला खुलासा!

“महापौर विश्वनाथ महाडेश्वर सरांनी माझा हात पिरगळला नाही. त्यांनी माझा विनयभंग केलेलाच नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रश्नच येत नाही.” असं ही महिला म्हणाली.

  • महापौरांनी विनयभंग केलाच नाही, 'त्या' महिलेने केला खुलासा!
SHARE

मुंबईतील सांताक्रूझच्या पटेलनगर इथं विजेच्या धक्क्याने माय-लेकाचा मृत्यू झाल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी रास्ता रोको केला होता. या दरम्यान मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर या ठिकाणी पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आले होते. तेव्हा रहिवाशांनी महाडेश्वर यांची वाट अडवल्यामुळे गोंधळ झाला. या गोंधळात महापौरांनी दमदाटी करून एका महिलेचा विनयभंग केल्याचा तथाकथित व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर महापौरांवर चोहोबाजूने टीका झाली. परंतु, "महाडेश्वर सरांनी फक्त माझा हात बाजूला केला, त्यांनी माझा हात पिरगळला नाही. तेव्हा कुठलाही विनयभंग झाला नाही", असा खुलासा या महिलेने केला आहे.

राजकीय कार्यकर्त्यांचा हात

ज्या महिलेसोबत महापौर यांचा शाब्दीक वाद झाला. त्या महिलेने एका व्हिडिओद्वारे त्या ठिकाणी घडलेल्या घटनेसंदर्भात आपली भूमिका मांडली.महापौर विश्वनाथ महाडेश्वर सरांनी माझा हात पिरगळला नाही. त्यांनी माझा विनयभंग केलेलाच नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रश्नच येत नाही.” एवढंच नाही, तर “व्हिडिओ व्हायरल करण्यामागे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असून त्यामागे विश्वनाथ महाडेश्वर सरांची बदनामी करणं हा त्यांचा हेतू आहे”, असं मतही या महिलेनं व्यक्त केलं आहे.


विनाकारण बदनामी 

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे माझी आणि महाडेश्वर सरांची विनाकारण बदनामी होत आहे. प्रत्यक्षात माझा विनयभंग झालेलाच नाही. मी महाडेश्वर सरांच्या विरोधात पोलिसांकडे विनयभंगाची तक्रार दाखल करावी, यासाठी राजकीय पक्षांचे पदाधिकारी माझ्याकडे सतत आग्रह धरत आहेत. पण मला राजकारणात अजिबात रस नाही. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही”, असंही ‘या’ महिलेने व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं आहे.

आरोप फुसका

महापौरांनी महिलांना दमदाटी केली आणि त्यांचा विनयभंग केला असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर काही पक्षांच्या महिला नेत्यांनी विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापौर पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. मात्र महिलेने दिलेल्या कबुलीनंतर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापौर पदाचा राजीनामा द्यावा, ही मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी केलेली मागणीच फुसकी ठरली आहे.हेही वाचा-

महापौरांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करा, काँग्रेसची मागणी

‘जनाची नाही तर मनाची लाज बाळगून राजीनामा द्या’, शालिनी ठाकरेंचं महापौरांना पत्रसंबंधित विषय
ताज्या बातम्या