Advertisement

बेशिस्त वाहनचालकांना वाहतूक पोलिसांचा दणका, वर्षभरात ३४ हजार लायसन्स रद्द

अपघातांना आळा बसावा आणि बेदकारपणे वाहन चालविणाऱ्यांना जबर बसावी यासाठी तीन महिन्यांसाठी वाहन परवाना रद्द करण्याच्या निर्णयाची नुकतीच राज्यात अंमलबजावणी करण्यात आली.

बेशिस्त वाहनचालकांना वाहतूक पोलिसांचा दणका, वर्षभरात ३४ हजार लायसन्स रद्द
SHARES

बेशिस्त वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी आणि  त्यांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) त्यांचे थेट परवानेच रद्द केले आहे.  २०१९ साली राज्यातील ५० विभागांत एकूण ३४ हजार वाहन परवाने(Vehicle Licenses) निलंबित  केले असून त्यात फोन वर बोलत गाडी चालवणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तब्बल १४ हजार ३५२ जणांना वाहन चालवताना मोबाइलवर बोलताना पडकले असून त्यांचे परवाने रद्द (Suspended) करण्यात आले आहे. २०१८ च्या तुलनेत कारवाईत मोठी वाढ दिसून येत आहे.

हेही वाचाः- १५ वर्षानंतर अखेर पोलिसांचा पूर्नविकासाचा प्रकल्प मार्गी लागला

मुंबईसह महाराष्ट्रात वाहन चालक मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन करतात. यामुळे अपघात आणि त्याचबरोबर मृत आणि जखमींची संख्या वाढते. अनेकांना अपंगत्व (Disability) येते. असे असतानाही बेशिस्त चालकांवर म्हणावी तशी कारवाई केली जात नसल्याचा ठपका अलीकडेच सर्वोच्च  न्यायालयाने  (Supreme court)ने नेमलेल्या उच्चस्तरीय रस्ता सुरक्षा समिती(High Level Road Safety Committee)ने ठेवला होता. त्यानंतर वाहतूक विभागाने नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार नोव्हेंबर २०१८मध्ये परिपत्रकही जारी करण्यात आले.  अपघातांना (Accident) आळा बसावा आणि बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांना जरब बसावी यासाठी तीन महिन्यांसाठी वाहन परवाना रद्द (vehicle licenses suspended) करण्याच्या निर्णयाची नुकतीच राज्यात अंमलबजावणी करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी यावर प्रभावी कारवाई सुरु केली. परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार २०१८ मध्ये २८ हजार ५४७ वाहन परवाने निलंबित करण्यात आले होते. यामध्ये वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे, लाल सिग्नल असतानाही तो ओलांडणे अशा प्रकरणांत सर्वाधिक कारवाई झाली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१९ मध्ये या कारवाईत वाढ झाली असून, ३४ हजार २७३ वाहन परवाने निलंबित केल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाने दिली. मोबाइलवर बोलताना वाहन चालवल्याने केलेल्या कारवाईत १४ हजार ३५२ आणि २०१८ मध्ये ८ हजार १२८ चालकांचे वाहन परवाने निलंबित झाले आहेत.

हेही वाचाः- केवायसी अपडेटसाठी तुम्हाला कुणाचा फोन आलायं का ?- सावधान

वाहनचालकांकडून वाहतूक नियम सर्रासपणे मोडले जातात. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करूनही परिस्थितीत सुधारणा होताना दिसत नाही. एखाद्या चालकाने तीन वेळा गुन्हा केल्यास त्याचा वाहन परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जातो. अशाने चालकांच्या मनमानी कारभाराला चाप लागतो. मात्र त्यांना कायमचा लगाम लागावा यासाठी केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाने मोटर वाहन कायद्यात बदल करून दंडात मोठी वाढ केली आहे. त्याची अद्याप मात्र महाराष्ट्रात अंमलबजावणी झालेली नाही.

हेही वाचाः- आदित्य ठाकरेंच्या वरळीला सर्वात 'स्वच्छ वार्ड' चा पुरस्कार

संबंधित विषय
Advertisement