COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,44,710
Recovered:
56,85,636
Deaths:
1,16,026
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,807
666
Maharashtra
1,39,960
9,830

दुचाकी चालकाने वाहतूक पोलिसाला उडवले, अपघात सीसीटिव्हीत कैद

मात्र शरद यांना न जुमानता चालकाने त्याच्या गाडीचा वेग कमी केला नाही. शरद पाटील यांनी या तरुणांना अडवण्याचा प्रयत्न केला.

दुचाकी चालकाने वाहतूक पोलिसाला उडवले, अपघात सीसीटिव्हीत कैद
SHARES

कुलाबा येथे विना परवाना ट्रिपलसिट प्रवास करणार्या दुचाकी चालकाने वाहतूक पोलिसाला धडक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या अपघातात वाहतूक पोलिस गंभीर जखमी झाला असून त्याला जवळील शासकिय रुग्णालयात दाखल केले आहे. हा सर्व अपघाताचा थरार सीसीटिव्हीत कैद झाला असून सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. या प्रकरणी कुलाबा पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

वाहतूक पोलीस शरद नाना पाटील हे कुलाबा परिसरामध्ये रस्त्यावरील वाहतूक नियंत्रित करत होते. दरम्यान, त्यांच्या समोरुन एका दुचाकीवरून ट्रिपल सिट आरोपी येत होते. हे पाहिल्यानंतर वाहतूकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्याच्या उद्देशाने शरद हे पुढे गेले. त्यांनी चालकाला दुचाकी थांबवण्याचा इशारा केला. मात्र शरद यांना न जुमानता चालकाने त्याच्या गाडीचा वेग कमी केला नाही. शरद पाटील यांनी या तरुणांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या तरुणांनी गाडी न थांबवता त्यांच्या अंगावर घातली.

या दुर्घटनेत शरद पाटील गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यात राजेश चव्हाण, आकाश राठोड व गोविंद राठोड यांच्या विरोधात कलम ३५३ ,३३३ ,३४ भा .द .वि .सह १२८ ,१२९ मो.वा. का अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा