Advertisement

अपंगत्व त्यांच्या कलेच्या आड येतच नाही!


अपंगत्व त्यांच्या कलेच्या आड येतच नाही!
SHARES

तुम्हाला जर नृत्य करायचं असेल, तर तुमचं शरीर फीट असायला हवं. आणि, महत्वाचं म्हणजे तुम्हाला ते नृत्य नीट जमायला हवं, असं म्हटलं जातं. पण खरं तर यातलं काहीही नृत्यासाठी हवंच असं नसतं. फक्त तुमची इच्छा आणि आवड असायला हवी. मग तुम्ही कोणतंही नृत्य करू शकता, हे सिद्ध करून दाखवलं आहे आर्ट फाऊंडेशन मध्ये नृत्याचं प्रशिक्षण घेणाऱ्या २५० दिव्यांग मुलामुलींनी.



प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक शामक दावर यांच्या विक्टरी आर्ट फाऊंडेशन अंतर्गत भारतातील 12 हजार दिव्यांग मुलांना नृत्याचे प्रशिक्षण दिले जाते. मुंबई, तसेच मुंबई बाहेरील अनेक सामाजिक संस्थांमधील दिव्यांग मुलांनाही शामक स्वत: नृत्याचे प्रशिक्षण देतात. यातल्याच २५० विद्यार्थ्यांनी मुंबईत बांद्रा येथील अँड्रूज ऑडिटोरिअममध्ये आपल्या कलेचे सादरीकरण केले. काही मुलांनी तर व्हीलचेअरवर बसून आपली कला सादर केली. या वेळी का कार्यक्रमाची थीम 'अद्भुत भारत' अशी होती. आणि मुलांसोबत त्यांच्या प्रशिक्षकांनीही यावेळी परफॉर्मन्स केले.



यावेळी नृत्यदिग्दर्शक शामक दावर हे स्वतः उपस्थित होते. 'डान्स नेहमीच थेरोपेटिक व व्यक्तिमत्त्व विकास करणारे माध्यम आहे' असेही यावेळी कोरिओग्राफर शामक दावर यांनी सांगितले.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा