‘ये अंधा कानून है’..., न्यायालयात वाजलेल्या गाण्याने एकच खळबळ

समयसूचकता दाखवून यावेळी पोलिसांनी तातडीने बॉम्ब शोधक पथका(​Bomb​​​)ला कोर्टात पाचारण केले आणि तपास सुरु झाला.

‘ये अंधा कानून है’...,  न्यायालयात वाजलेल्या गाण्याने एकच खळबळ
SHARES

अमिताभ बच्चन(Amitabh bachchan)च्या ‘अंधा कानून’ या चित्रपटातील (Hindi movie) ‘ये अंधा कानून है’ हे गाण वांद्रे न्यायालयात (Bandra Court) सुनावणी दरम्यान वाजल्याने काही मिनिंटांसाठी कोर्टात एकच हशा पिकला. विशेष म्हणजे हा मोबाइल ज्या पिशवीत ठेवण्यात आला होता.त्यावर 'बॉम्ब' (Bombs)असे लिहिलेली चिठ्ठी आढळल्याने एकच खळबळ उडाली. अज्ञात पिशवी कुणाची आहे हे अद्याप कळू शकलेले नाही.  मात्र घडलेल्या प्रकारामुळे न्यायाधीशांच्या सहित आरोपी, वकील व उपस्थित सर्वच भीतीने पाणी पाणी झाले होते.

हेही वाचाः- बेशिस्त वाहनचालकांना वाहतूक पोलिसांचा दणका, वर्षभरात ३४ हजार लायसन्स रद्द

वांद्रे न्यायालयात शनिवारी म्हणजेच १८ जानेवारी रोजी एका खटल्यावर सुनावणी सुरू होती. वकिलांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू असताना. अचानक अमिताभ बच्चन यांच्या ‘अंधा कानून’ चित्रपटातील ‘ये अंधा कानून है’ हे गाणं वाजलं, सुरूवातीला कुणी तरी खोडसाळपणे हे कृत्य केल्याचा अंदाज वर्तवला जात होता. आवाज नेमका येतोय कुठून ते कळत नसल्याने सर्वांचीच घाबरगुंडी उडाली होती. तर न्यायाधीशांचा पारा चांगलाच चढला. थोड्यावेळ शोधाशोध केल्यांनतर अखेरीस कोर्टात पडलेल्या एका निळ्या रंगाच्या बॅगेतून हा आवाज येत असल्याचे समजले, कोर्टात एका निळ्या रंगाच्या पिशवीतील मोबाइल(Mobile)ची ही रिंगटोन वाजत असल्याचे निदर्शनास आले. मात्र ज्या निळ्या रंगाच्या पिशवीतून या गाण्याचा आवाज येत होता. नेमका त्याच पिशवीवर पोलिसांना बॉम्ब लिहिलेली एक चिठ्ठी सापडली. ज्यामुळे तणावात आणखीनच भर पडली. समयसूचकता दाखवून यावेळी पोलिसांनी तातडीने बॉम्ब शोधक पथका(Bomb squad)ला कोर्टात पाचारण केले आणि तपास सुरु झाला.

हेही वाचाः- १५ वर्षानंतर अखेर पोलिसांचा पूर्नविकासाचा प्रकल्प मार्गी लागला

 अखेरीस या पथकाच्या तपासात मात्र काहीच सापडले नाही . हे कोण्या अज्ञात व्यक्तीचे भीती पसरवण्यासाठी केलेले काम असल्याचा  अंदाज पोलिसांनी वर्तवला. त्यामुळे दिवसभर न्यायालय परिसरात घटनेच्या कुजबूज सुरू होती. दरम्यान, यापूर्वी अनेकदा कोर्टाच्या सुनावणीत अनेक विचित्र प्रकार घडले आहेत, कधी न्यायधीशाना चप्पल फेकून मारण्यापासून ते आरडाओरडा करेपर्यंत ही उदाहरणे अनेकदा समोर आली आहेत, मात्र या वेळेस घडलेला हा प्रकार केवळ विचित्रच नव्हे, तर भीतीदायक देखील असल्याचे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. या घटनेची चौकशी अद्याप सुरू असून संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिस न्यायालय परिसरातील सीसीटिव्ही (CCTV) तपासणार आहेत. 

हेही वाचाः- मुंबई पोलीस घोड्यांवरून घालणार गस्त…


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा