Advertisement

वरुण-श्रद्धाचा 'स्ट्रीट डान्सर' हिंदीसह आणखी दोन भाषांमध्ये

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबत आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून माहिती दिली आहे.

वरुण-श्रद्धाचा 'स्ट्रीट डान्सर' हिंदीसह आणखी दोन भाषांमध्ये
SHARES

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि श्रद्धा कपूर लवकरच 'स्ट्रीट डान्सर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट ‘एबीसीडी’ सिरीजचा तिसरा भाग अाहे. हिंदीसह तेलुगू आणि तामिळ भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित करण्याच्या निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबत आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून माहिती दिली आहे.

स्ट्रीट डान्सर या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसुजा करत आहे. भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, क्रिश्नन कुमार आणि लिझेले डिसूजा हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. वरुण धवन, श्रद्धा कपूर, प्रभू देवा आणि नोरा फतेही यांनी चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

बुधवारी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार असल्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. २४ डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.


हेही वाचा

नव्या 'बंटी और बबली'ला भेटलात का?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा