Advertisement

नव्या 'बंटी और बबली'ला भेटलात का?

अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा बंटी और बबली चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नव्या 'बंटी और बबली'ला भेटलात का?
SHARES

अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा बंटी और बबली चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २००५ साली बंटी और बबली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. चित्रपटातील अभिषेक आणि राणीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. शिवाय चित्रपटाची कथा देखील प्रेक्षकांना भावली होती

पहिला चित्रपट हिट ठरल्यानंतर लवकरच बंटी और बबली २ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिद्धांत चतुर्वेदी आणि नवोदित अभिनेत्री शर्वरी हे दोन कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आदित्य चोप्रा या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ‘बंटी और बबली २’ या चित्रपटाच्या शूटींगला सुरूवात झाली आहे.


वरुण शर्मा ‘बंटी और बबली २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. वरुण शर्मा यांनी 'सुल्तान' आणि 'टायगर जिंदा है' या चित्रपटाचे सहदिग्दर्शन केलं होतं

बंटी और बबलीच्या पहिल्या भागात राणी मुखर्जी होती. चित्रपटाच्या दुसऱ्या सिक्वेलमध्ये देखील चाहत्यांना राणी मुख्य भूमिकेत दिसेल अशी अपेक्षा होती. पण चाहत्यांना एक नवीन जोडी चित्रपटात पाहता येणार आहे. 

अभिनेत्री शर्वरीचा हा पहिला चित्रपट आहे. तर सिद्धांत चतुर्वेदीला खरी ओळख गली बॉयमधल्या एम सी शेर या भूमिकेमुळे मिळाली. इन साइड एज या वेबसिरीजमध्ये देखील सिद्धार्थनं आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. आता बंटी बनून तो प्रेक्षकांच्या किती पसंतीस उतरतो हे पाहणं औत्सुक्याचं आहे.


हेही वाचा

रजनिकांत यांचा 'दरबार', २५ वर्षानंतंर साकारणार पोलिसांची भूमिका

बॉलिवूडचा 'हा' गाजलेला चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा