Advertisement

बॉलिवूडचा 'हा' गाजलेला चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर

भारताकडून ऑस्करच्या सर्वोत्तम परदेशी भाषा चित्रपट विभागासाठी या चित्रपटाची निवड करण्यात आली होती. पण भारतीयांच्या हाती निराशा आली आहे.

बॉलिवूडचा 'हा' गाजलेला चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर
SHARES

भारतीय चाहत्यांचा हिरमोड करणारी एक बातमी आहे. झोया अख्तर दिग्दर्शित अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा ‘गली बॉय’ हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीमधून बाहेर पडला आहे. भारताकडून ऑस्करच्या सर्वोत्तम परदेशी भाषा चित्रपट विभागासाठी ‘गली बॉय’ चित्रपटाची निवड करण्यात आली होती. सोमवारी १६ डिसेंबर रोजी अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्सनं जाहीर केलेल्या सर्वोत्तम दहा परदेशी भाषांमधील चित्रपटांच्या यादीमध्ये ‘गली बॉय’ला स्थान मिळालेले नाही.

अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्सनं जाहीर केलेल्या यादीत द पेन्टेड बर्ड (The Painted Bird- Czech Republic), ट्रूथ अ‍ॅण्ड जस्टिस (Truth and Justice- Estonia), लेस मिसरेब्लस (Les Misérables-France), दोज हू रीमेन्स (Those Who Remained-Hungary), हनीलँड (Honeyland-North Macedonia), कॉर्पस क्रिस्टी (Corpus Christi-Poland), बीनपोल (Beanpole-Russia), अटलांटिक्स (Atlantics-Senegal), पॅरासाईट (Parasite-South Korea) आणि पेन अॅण्ड ग्लोरी (Pain & Glory-Spain) या चित्रपटांनी स्थान पटकावलं आहे.


मुंबईच्या चाळ संस्कृतीतून रॅपर्सच्या दुनियेत नावलौकिक मिळवणाऱ्या ‘डिव्हाइन’ म्हणजे विवियन फर्नांडिस आणि ‘रॅपर नॅझी’ म्हणजेच नावेद शेख यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांपासून ‘गली बॉय’च्या कथानकासाठी प्रेरणा घेण्यात आली आहे. चित्रपटातील रणवीर आणि आलियाच्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०१९ला प्रदर्शित झाला होता. चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.



हेही वाचा

नवी मुंबईतील काॅन्सर्टसाठी 'त्यांनी' अख्खी लोकल ट्रेनच घेतली भाड्याने

नेहरूंबद्दल आक्षेपार्ह टीका, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा