Advertisement

नवी मुंबईतील काॅन्सर्टसाठी 'त्यांनी' अख्खी लोकल ट्रेनच घेतली भाड्याने

या काॅन्सर्टच्या आयोजकांनी चक्क संपूर्ण लोकल ट्रेनच भाड्याने घेतली आहे. अशा कार्यक्रमासाठी एखादी लोकल ट्रेन भाड्याने घेण्याची ही पहिलीच घटना आहे.

नवी मुंबईतील काॅन्सर्टसाठी 'त्यांनी' अख्खी लोकल ट्रेनच घेतली भाड्याने
SHARES

आंतरराष्ट्रीय पातळीवरील नावाजलेला राॅकबँड ‘यू-२’ नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये रविवारी होणाऱ्या ‘जोशुआ ट्री टुअर २०१९’ काॅन्सर्टसाठी भारतात दाखल होत आहे. या काॅन्सर्टसाठी मुंबई आणि नवी मुंबईतील रसिकांना वाहतूककोंडीमुळे उशीर होऊ नये, याकरीता या काॅन्सर्टच्या आयोजकांनी चक्क संपूर्ण लोकल ट्रेनच भाड्याने घेतली आहे. अशा कार्यक्रमासाठी एखादी लोकल ट्रेन भाड्याने घेण्याची ही पहिलीच घटना आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या राॅकबँड ‘यू-२’ चं भारतात पहिल्यांदाच काॅन्सर्ट आयोजित केलं जात आहे. या काॅन्सर्टसाठी केवळ मुंबई, नवी मुंबईच नाही तर देशभरातील संगीतप्रेमी डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये दाखल होणार आहेत. रविवारी १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता या काॅन्सर्टला सुरूवात होणार आहे. यावेळेत रस्त्यावरील वाहतूककोंडीत रसिक अडकू नयेत यासाठी त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याच्या सूचना आयोजकांकडून करण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा- पानिपत चित्रपटातील 'त्या' सीनवर कात्री

यासाठी या काॅन्सर्टच्या आयोजकांनी भाड्याने घेतलेली विशेष लोकल ट्रेन रविवारी अंधेरी ते नेरूळ या मार्गावर चालवण्यात येईल. ही लोकल अंधेरी स्थानकातून दुपारी २.५५ वाजता नेरूळच्या दिशेने सुटेल. ही लोकल माहीम रेल्वे स्थानकात दुपारी ३.१० वाजता आणि कुर्ला स्थानकात दुपारी ३.२० वाजता दाखल होईल. या स्थानकांवर ही ट्रेन सुमारे ३० सेकंद थांबेल. तसंच काॅन्सर्ट संपल्यावर रात्री १०.५० वाजता नेरूळ स्थानकातून ही लोकल अंधेरीच्या दिशेने रवाना होईल. ही ट्रेन कुठल्या स्थानकावरून सुटेल हे तिकीट नोंदणी करणाऱ्या रसिकांना रविवारी एसएमएसच्या माध्यमातून कळवण्यात येईल. 

स्टेडियमच्या ठिकाणी गाड्या पार्क करण्याची कुठलीही सोय आयोजकांकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे कुठल्याही प्रेक्षकांनी गाड्या आणू नये असं आवाहनही आयोजकांकडून करण्यात आलं आहे. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा