पानिपत चित्रपटातील 'त्या' सीनवर कात्री

जाट समुदायाकडून चित्रपटाच्या एका सीनला विरोध करण्यात येत आहे.

SHARE

नुकताच प्रदर्शित झालेल्या पानिपत चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जाट समुदायाकडून चित्रपटाच्या एका सीनला विरोध करण्यात येत  आहे. जाट समुदायाच्या विरोधानंतर चित्रपटातील काही सीनला कात्री लागणार आहे. अखेर सिनेमाच्या निर्मात्यांनी काही सीनवर कात्री मारण्याचा निर्णय घेतला आहे

भरतपुरचे तत्कालीन महाराज सूरजमल यांची व्यक्तिरेखा चुकीच्या पद्धतीनं दाखवली म्हणून जाट समूदायानं सिनेमाचा कडाडून विरोध केला. यासंदर्भात समुदायाच्या नेत्यांनी सोमवारी सरकारला निवेदनही पाठवलं होतं. यावर सरकारनं वितरकांच्या मध्यस्तीनं सिनेमाच्या निर्मात्यांकडे उत्तरही मागितलं होतं.


सिनेमागृहात चित्रपट प्रदर्शित झाल्यावर राजस्थानमधील अनेक चित्रपटगृहांमध्ये तोडफोडही करण्यात आली. शिवाय चित्रपटाचे पोस्टरदेखील फाडण्यात आले. त्यामुळे राजस्थानमधील परिस्थिती अधिक चिघळण्याच्या आत या प्रकरणात सेन्सॉर बोर्डानं हस्तक्षेप करत योग्य ती पाऊलं उचलावीत अशी मागणी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली होती.'निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच कुठले वाद निर्माण होऊ नयेत यासाठी काळजी घ्यायला हवी. ही पूर्ण निर्मात्याची जबाबदारी आहे. पडद्यावर सादर करण्यात येणाऱ्या पात्राविषयी सखोल अभ्यास असला पाहिजे. कला आणि कलाकारांचा सन्मान व्हायला हवा या मताचा मी आहे. यासोबतच कोणत्याही जातीचा, धर्माचा, समुदायाचा, महापुरुष किंवा देवतांचा अपमान होऊ नये याची खबरदारी त्यांनी घेतली पाहिजे' असं ट्विट गेहलोत यांनी केलं होतं.हेही वाचा

शाहरुख आणि गौरी खानचा 'हा' व्हिडिओ व्हायरल

'छपाक'चा ट्रेलर प्रदर्शित, दीपिकाचा दमदार अभिनय

संबंधित विषय
ताज्या बातम्या