Advertisement

'छपाक'चा ट्रेलर प्रदर्शित, दीपिकाचा दमदार अभिनय

'छपाक'च्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून पसंत तर केलं जातंय शिवाय चित्रपटातील दीपिकाच्या लुकची आणि अभिनयाची जोरदार चर्चा सुरू आहे.

'छपाक'चा ट्रेलर प्रदर्शित, दीपिकाचा दमदार अभिनय
SHARES

अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित 'छपाक' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. अभिनेत्री दीपिका पदुकोणनं चित्रपटात लक्ष्मी अगरवालची भूमिका साकारत आहे. तर दीपिकासोबत विक्रांत मॅसी देखील चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसतोय. 'छपाक'च्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून पसंत तर केलं जातंय शिवाय चित्रपटातील दीपिकाच्या लुकची आणि अभिनयाची जोरदार चर्चा सुरू आहे.


'छपाक' चित्रपटात दीपिका पदुकोण मालती हे पात्र चित्रपटात साकारत आहे. जिच्यावर अॅसिड हल्ला करण्यात येतो. या अॅसिड हल्ल्यामध्ये तिचा संपूर्ण चेहरा भाजतो. या अॅसिड हल्ल्यानंतर संपूर्ण देश मालतीच्या पाठिशी उभा राहतो आणि आरोपींना लवकर पकडून फाशीची शिक्षा द्यावी अशी सर्वस्तरातून मागणी केली जाते. यासाठी अनेक आंदोलनं केली जातात. हेच चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला दाखवण्यात आलं आहे. 'लक्ष्मी अगरवालवर अॅसिड हल्ला करणाऱ्यांना फासी द्या' अशी मागणी करत संपूर्ण देशभर आंदोलन केली जातात, यानेच ट्रेलरची सुरुवात होते.

अॅसिड हल्ला झाल्यानंतर मालती यातून कशी उभी राहते? आरोपींना शिक्षा देण्यासाठी आणि स्वत:ला न्याय मिळवून देण्यासाठी ती कशी लढते? हे यात दाखवण्यात आलं आहे. एक अॅसिड पीडिता हल्ल्यानंतर कशाप्रकारे आयुष्य जगते किंवा तिला कुठल्या समस्यांचा सामना करावा लागतो, हे चित्रपटातून मांडलं आहे. अॅसिड हल्ल्यात दीपिका म्हणजे मालतीचा चेहरा इतका भाजला असतो की ती स्वत:चा चेहरा जगापासून लपवते. स्वत:चा चेहरा आरशात पाहून ती स्वत: घाबरते आणि किंचाळते असं ट्रेलरमधील सिनमध्ये दाखवण्यात आलं आहे. पण न्यायासाठी लढाई लढताना हळूहळू तिच्यातील हा न्यूनगंड ती कसा दूर करते आणि इतर अॅसिड हल्ला पीडितांच्या पाठिशी खंबीर उभी राहते. 

याशिवाय ट्रेलरमधील काही डायलॉग दमदार आहेत. 'नाक नही है कान नही है झुमके कहा लटका उँगी' हा डायलॉग अॅसिड हल्ला पीडितांचे दु:ख दर्शवतात. अॅसिड हल्ल्यानंतर एका पीडितेकडे पाहण्याच्या लोकांच्या नजरा कशा बदलतात? याचा त्या कशा सामना करतात? हे चित्रपटात पाहता येणार आहे.

'छपाक' पुढच्या वर्षी १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी दीपिकाचा वाढदिवस देखील आहे. रणवीर सिंगसोबत विवाहबद्ध झालेल्या दीपिकाचा लग्नानंतरचा हा पहिला चित्रपट आहे. छपाकसोबतच ती '83' या चित्रपटातही झळकणार आहे. हा चित्रपट १० एप्रिलला प्रदर्शित होणार आहे



हेही वाचा

कपिल झाला 'बाप'माणूस

लता दीदींचे रुग्णालयातील फोटो व्हायरल

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा