Advertisement

कपिल झाला 'बाप'माणूस

कॉमेडियन कपिल शर्माच्या घरून एक गुड न्यूज आला आहे. कपिलची पत्नी गिन्नी चतरथनं मुलीला जन्म दिला आहे.

कपिल झाला 'बाप'माणूस
SHARES

कॉमेडियन कपिल शर्माच्या घरून एक गुड न्यूज आला आहे. कपिलची पत्नी गिन्नी चतरथनं मुलीला जन्म दिला आहे. मित्र- मैत्रिणी आणि आप्तेष्टांकडून कपिल आणि गिन्नीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कपिलनं स्वतः ट्वीट करून ही आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांना दिली


सेलिब्रिटींच्या शुभेच्छा

ट्वीटमध्ये त्यानं म्हटलं आहे की, 'मुलगी झाली असून तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. तुम्हा सर्वांना भरभरून प्रेम. जय माता दी.' कपिलच्या या ट्वीटवर अनेक सेलिब्रिटींनीही त्याला शुभेच्छा दिल्या. कीकू शारदा, रकुल प्रीत, गुरु रंधावा, सायना नेहवाल, दिया मिर्झा यांसारख्या अनेक बड्या सेलिब्रिटींनी त्याला ट्विटरवर शुभेच्छा दिल्या.

कपिल-गिन्नीची पहिली भेट

गेल्या वर्षी १२ डिसेंबर रोजी हे दोघं लग्नाच्या बेडीत अडकले होते. काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत कपिलनं गिन्नीसोबतच्या भेटीची स्टोरी सांगितली होती. कपिलनं सांगितलं की, 'मी एचएमवी कॉलेज जालंधर इथून शिक्षण पूर्ण केलं आहे. मी स्कॉलरशिप होल्डर होतो आणि थिएटरमध्ये नॅशनल विनरही राहिलो. ही गोष्ट २००५ ची आहे, जेव्हा मी आईपीजे कॉलेजमध्ये शिकत होतो आणि पॉकेट मनीसाठी नाटक दिग्दर्शित करायचो. मी विद्यार्थ्यांचे ऑडिशन घेण्यासाठी गिन्नीच्या कॉलेजमध्ये गेलो होतो. गिन्नीसुद्धा ऑडिशनसाठी आली होती. हीच आमची पहिली भेट होती. त्यावेळी गिन्नी १९ आणि मी २४ वर्षांचा होतो.

मुलींच्या ऑडिशन झाल्यानंतर मी गिन्नीवर इम्प्रेस झालो होतो. मी तिलाच इतर मुलींच्या ऑडिशन घ्यायला सांगितल्या. जेव्हा आम्ही रिहर्सल सुरू केल्या, तेव्हा गिन्नी माझ्यासाठी घरुन जेवण आणत असे. मला सुरुवातीला वाटलं की, तिला माझा आदर वाटत असावा म्हणून ती असं करत आहे. एका मित्रानं मला कल्पना दिली होती की, गिन्नी मला पसंत करतेय. पण माझा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. एके दिवशी मीच गिन्नीला विचारले की, तू मला पसंत करतेस का तर तिनं हो असं उत्तर दिलं.'हेही वाचा

'लाल सिंह चड्ढा'मधील आमिरचा नवा लुक रिलीज


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा