'लाल सिंह चड्ढा'मधील आमिरचा नवा लुक रिलीज

काही दिवसांपूर्वी आमिरनं 'लाल सिंह चड्ढा'चा फर्स्ट लुक रिलीज केला होता. आता त्याचा आणखी एक नवा लुक समोर आला आहे.

  • 'लाल सिंह चड्ढा'मधील आमिरचा नवा लुक रिलीज
  • 'लाल सिंह चड्ढा'मधील आमिरचा नवा लुक रिलीज
SHARE

इंडस्ट्रीतील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा त्याच्या आगामी 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटातील नवीन लुक समोर आला आहे. आमिरच्या एका चाहत्यानं त्याचा जैसलमेरच्या शूटिंग सेटवरुन हा फोटो शेअर केला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत करिना कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

फोटोत आमिर वाढलेले केस आणि दाढीत दिसतोय. त्यानं डोक्यावर टोपी घातली आहे. काही दिवसांपूर्वी आमिरनं 'लाल सिंह चड्ढा'चा फर्स्ट लुक रिलीज केला होता. शेअर केलेल्या पोस्टमध्ये आमिर सरदारच्या रुपात दिसला होता. तर आता लीक झालेल्या फोटोत तो वाढलेल्या दाढी आणि केसांमध्ये दिसतोय.


'लाल सिंह चड्ढा' हॉलिवूड 'फॉरेस्ट गंप'चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. हॉलिवूडपटात चित्रपटातील मुख्य पात्र फॉरेस्टचा मेंदू कमी काम करतो. पण तरीदेखील तो एक यश मिळवतो आणि ऐतिहासिक पुरुष बनतो. या चित्रपटाला ऑस्करमध्ये एक डझनहून अधिक नॉमिनेश मिळाले होते आणि सहा ऑस्कर अवॉर्ड्स चित्रपटानं आपल्या नावी केले होते. टॉम हँक्सला या चित्रपटासाठी बेस्ट अॅक्टरचा दुसरा ऑस्कर मिळाला होता. हिंदी रिमेकमध्ये आमिर टॉम हँक्सनं साकारलेली व्यक्तिरेखा साकारत आहे.


हेही वाचा

'या' खास दिनी प्रदर्शित होणार 'छपाक'चा ट्रेलर

‘तान्हाजी’ मराठीतूनही होणार प्रदर्शित

संबंधित विषय
ताज्या बातम्या