'या' खास दिनी प्रदर्शित होणार 'छपाक'चा ट्रेलर

छपाक चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाआधी दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी चित्रपटाच्या टिझरची झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

SHARE

अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित 'छपाक' या चित्रपटाचा ट्रेलर १० डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. त्यापूर्वी दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी चित्रपटाच्या टिझरची झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या व्हिडिओत अॅसिड फेकताना उडणारे थेंब दिसत आहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोणनं चित्रपटात लक्ष्मी अगरवालची भूमिका साकारली आहे.

'छपाक' पुढच्या वर्षी १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी दीपिकाचा वाढदिवस देखील आहे. 'छपाक'मध्ये दीपिकाच्या पात्राचं नाव मालती आहे. तिच्यासोबत अभिनेता विक्रांत मैसी महत्त्वाच्या भूमिकेत आहे. विक्रांतच्या पात्राचं नाव अमोल आहे. काही दिवसांपूर्वी मेघनानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर करुन लिहिलं, ''अमोल आणि मालती मी तुम्हाला कायम माझ्यासोबत ठेवेन.''

रणवीर सिंगसोबत विवाहबद्ध झालेल्या दीपिकाचा लग्नानंतरचा हा पहिला चित्रपट आहे. छपाकसोबतच ती '83' या चित्रपटातही झळकणार आहे. हा चित्रपट १० एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात रणवीर आणि दीपिकासह पंकज त्रिपाठी, ताहिर राज भसीन, साकिब सलीम, एमी विर्क आणि चिराग पाटील यांच्या मुख्य भूमिका आहेतहेही वाचा

‘तान्हाजी’ मराठीतूनही होणार प्रदर्शित

टीव्ही अभिनेत्रीसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी शाहरुखला अटक


संबंधित विषय
ताज्या बातम्या