टीव्ही अभिनेत्रीसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी शाहरुखला अटक

एम टीव्हीवरील स्प्लिटव्हिला या शोमधून प्रकाशझोतात आलेल्या अभिनेत्रीसोबत ही घटना घडली आहे.

SHARE

हैदराबाद इथल्या महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणावर सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. फक्त ही एक घटना नाही अशा घटना किती तरी महिलांसोबत होत असतात. छेडछाड करणं, घाणेरड्या कमेंट करणं, घाणेरड्या नजरेनं पाहणं अशा किती तरी घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. नुकताच एका छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी २९ वर्षीय शाहरुख शेख नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. तो वरळीच्या मरियप्पा नगरमध्ये राहणारा असून एका प्रसिद्ध नाइट क्लबमध्ये तो काम करत असल्याचं समोर आलं आहे.

एम टीव्हीवरील स्प्लिटव्हिला या शोमधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री हर्षिता कश्यपसोबत ही घटना घडली आहे. हर्षिता चर्नी रोड रेल्वे स्टेशनवर एनआरआय मित्र पालासोबत तिकीट काढण्यासाठी रांगेत उभी होती. त्यावेळी शाहरुख नावाचा हा व्यक्ती तिच्याकडे एकटक पाहात उभा होता. सुरुवातीला हर्षितानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. नंतर ती व्यक्ती हर्षिताचा पाठलाग करु लागली.

हर्षितानं त्या व्यक्तीला जाऊन पाठलाग का करत आहे? असा प्रश्न विचारला. "त्या व्यक्तीनं उद्धटपणे मी तुझ्याकडे पाहतोय तर समस्या काय आहे? असं उत्तर दिलं. त्यानंतर आमच्यात वाद झाला. त्यानं माझा मित्र पालावर हात उचलला. मग मी सुद्धा त्या व्यक्तीवर हात उचलला. काही वेळातच रेल्वे पोलिस आले. त्यांनी आमची मदत केली आणि त्या व्यक्तीला पकडून नेलं.” या झटापटीमध्ये हर्षिताच्या हाताला दुखापत झाली आहे.संबंधित विषय
ताज्या बातम्या