Advertisement

लता दीदींचे रुग्णालयातील फोटो व्हायरल

जवळपास एक महिना ब्रीच कँडी रुग्णालयात लता मंगेशकरांवर उपचार सुरू होते. लता दीदींचे रुग्णालयातील काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

लता दीदींचे रुग्णालयातील फोटो व्हायरल
SHARES

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा असून त्यांना घरी आणण्यात आलं आहे. निमोनिया झाल्यामुळे त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. छातीचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना वेन्टिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आता त्यांची प्रकृती स्वस्थ आहे.

जवळपास एक महिना ब्रीच कँडी रुग्णालयात लता मंगेशकरांवर उपचार सुरू होते. लता दीदींचे रुग्णालयातील काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये त्या रुग्णालयातील नर्ससोबत दिसत आहेत.




लता दीदींनी सोमवारी ट्वीट करत प्रकृती स्वस्थ असल्याची माहिती दिली. ट्वीटमध्ये त्या म्हणाल्या की, "गेल्या २८ दिवसांपासून मी ब्रीच कँडी रुग्णालयात होते. मला न्यूमोनीया झाला होता. त्यामुळे माझ्यावर रुग्णालयात उपचार करणं योग्य असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं. आईच्या क्रुपेनं माझी प्रकृती स्थिर आहे. माझ्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्यांची मी आभारी आहे."

आणखी एक ट्वीट करत लता दीदींनी डॉक्टर आणि त्यांच्या टीमनचे देखील आभार मानले आहेत. 

लतादीदींना निमोनियाची लागण झाल्यामुळे तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. ९० वर्षीय दीदींना श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. ११ नोव्हेंबरला त्यांना मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात भरती करण्यात आले होतं. प्रकृती स्वस्थ नसल्याचं कळताच लता दीदींच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. अनेकांनी ट्वीटर आणि फेसबुकवरून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली होती. अखेर लता दीदींच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं.



हेही वाचा

कपिल झाला 'बाप'माणूस

'लाल सिंह चड्ढा'मधील आमिरचा नवा लुक रिलीज


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा