प्रेयसीच्या बदनामीसाठी सिद्धिविनायक मंदिर बॉम्बनं उडवण्याची धमकी

प्रेयसीची बदनामी करण्यासाठी एका प्रियकरानं मुंबईतील जगप्रसिद्ध सिद्धीविनायक गणेश मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याबाबत ठाण्याच्या विवियाना मॉलमधील बाथरूममध्ये एक संदेश लिहिल्याचं आढळलं होतं.

प्रेयसीच्या बदनामीसाठी सिद्धिविनायक मंदिर बॉम्बनं उडवण्याची धमकी
SHARES

प्रेयसीची बदनामी करण्यासाठी एका प्रियकरानं मुंबईतील जगप्रसिद्ध सिद्धीविनायक गणेश मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याबाबत ठाण्याच्या विवियाना मॉलमधील बाथरूममध्ये एक संदेश लिहिल्याचं आढळलं होतं. यामध्ये प्रियकरानं पूर्वाश्रमीच्या प्रेयसीची बदनामी करण्यासाठी संदेश लिहिला होता. या प्रकरणी पोलीसांनी एका संशयितास अटक केली आहे.

दहशतवादी संदेश

ठाणे येथील विवियाना मॉल इथं रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास तळमजला व पहिला माळा बाथरूम मध्ये Gazva-E- Hind ISIS यांच्या वतीनं 'दादर सिद्धिविनायक मंदिर Boom’ असा दहशतवादी संदेश आढळून आला होता. विवियाना मॉलच्या जाहीरात पॅम्प्लेटवर स्केचपेनानं लिहून त्यावर ९१३७८०४३०८ व दुसऱ्या पॅम्प्लेटवर ९७६८४५०८५५ असे मोबाईल नंबर लिहून विवियाना मॉलच्या परिसरात व आजूबाजूच्या भागात भयग्रस्त व दहशतवादी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

पोलीस बंदोबस्त

या प्रकरणी दहशतवादी संघटनांची नावं असलेल्या या संदेशामुळं विवियाना मॉल व आजूबाजुच्या परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. तसंच, या संदेशाबाबत वरिष्ठांना आणि एटीएस यांना कळवण्यात आलं होतं. पॅम्प्लेटमधील मोबाईल नंबरवरून दिपाली कांतीलाल भानुशाली यांचा शोध घेऊन त्यांना बोलावून विचारपूस केली असता त्यांनी त्यांचा विक्रोळी इथं राहणारा पूर्वीचा प्रियकर केतन घोडके यानं बदनामी व्हावी व तिला पोलिसांकडून त्रास व्हावा म्हणून हा संदेश लिहिला असावा असा संशय व्यक्त केला.

प्रतिबंधक कारवाई

दिपालीच्या संशयानुसार पोलिसांनी विक्रोळी इथं केतन घोडके याची चोकशी करत त्याला ताब्यात घेतलं. तसंच याप्रकरणी त्याला विचारलं असता त्यानंच हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी केतनवर वर्तक पोलीस ठाण्यात नॉन कॉग्नेझबल गुन्हा क्रमांक १२१८/२०१९ कलम ५०५ आयपीएसप्रमाणं दाखल करण्यात आला आहे. तसंच, केतन घोडके यास प्रतिबंधक कारवाई खाली अटक करण्यात आली आहे.



हेही वाचा -

राज्याचा आर्थिक पाहणी अहवालही फुगवला? विरोधकांनी केली आकडेवारी तपासण्याची मागणी

केईएम रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरची आत्महत्या



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा