केईएम रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरची आत्महत्या

मुंबईतील परळ येथील केईएम रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ओंकार महेश ठाकूर (२१) असं या डॉक्टरचं नाव आहे.

केईएम रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरची आत्महत्या
SHARES

मुंबईतील परळ येथील केईएम रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ओंकार महेश ठाकूर (२१) असं या डॉक्टरचं नाव आहे. सोमवारी सकाळी ओंकारनं आत्महत्या केली असून त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

घराच्या टेरेसवरून उडी

प्रशिक्षणार्थी डॉक्टर ओंकार ठाकूर हा दादर पश्चिमेकडील कोहिनूर टॉवरमध्ये राहत होता. ओंकार हा केईएम हॉस्पिटलमध्ये फिसीओथेरपीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. सोमवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास त्यानं राहत्या घराच्या टेरेसवरून उडी मारली. याबाबत माहिती मिळताच त्यांला तातडीनं सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.

घटनेचा अधिक तपास

कोलकात्यामध्ये डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी देशभरात डॉक्टरांनी काम बंद केलं आहे. त्यामुळं डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांमुळं सध्या देशभरात वातावरण तापलं आहे. तसंच, सध्या सुरू असलेल्या डॉक्टरांच्या आंदोलनाशी त्याच्या आत्महत्येचा काही संबंध होता का, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.हेही वाचा - 

भाजपानं स्थिर सरकार चालवण्यासाठी काही नियम-कायदे केले आहेत काय?- अजित पवार

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर खाते वाटप जाहीर, पाहा कोणाला कोणतं खातं?Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा