आता विजय वडेट्टीवार यांना खेचून घेऊ नका- अजित पवार

ज्याप्रमाणे राधाकृष्ण विखे पाटील यांना तुम्ही खेचून घेतलं, त्याप्रमाणे नवीन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना तुम्ही घेऊन जाऊ नका, अशी विनंती अजित पवार यांनी केली. तेव्हा सभागृहात एकच हशा पिकला.

SHARE

राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत नव्या मंत्र्यांची ओळख करून दिली. काही जण राष्ट्रवादी किंवा काँग्रेसमधून आलेले असताना देखील त्यांना मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद देण्यात आलं आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला.

अजित पवारांची टीका

'भाजपानं स्थिर सरकार चालवण्यासाठी काही नियम-कायदे केले आहेत काय?, एखाद्या व्यक्तीनं पक्षाचा राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर पुन्हा निवडून यावं लागतं. पुन्हा निवडून न येता खालच्या किंवा वरच्या सभागृहाचं सदस्य नसताना मंत्रिपदाची शपथ घेता येत नाही', असं अजित पवार यांनी म्हटलं. तसंच, 'भाजपामध्ये निष्ठावंतांना मागे ठेवलं जातं आहे', अशी टीका देखील अजित पवारांनी केली.

दरम्यान काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेते म्हणून जाहीर करण्याची विनंती अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे केली. त्यावर आधी एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते झाले, त्यांना भाजपने सत्तेत घेतलं. नंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनाही तुम्ही खेचून घेतलं, आता निवडणुका होईपर्यंत तरी नवीन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना तुम्ही घेऊन जाऊ नका, अशी विनंती अजित पवार यांनी केली. तेव्हा सभागृहात एकच हशा पिकला.

चोख प्रत्युत्तर

अजित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 'अशा प्रकारचा कुठलाही कायदा नाही, जर एखादी व्यक्ती पात्र असेल, तर भारतीय संविधानानं तिला मंत्री बनण्याचा अधिकार दिला आहे. मग तो कुठल्याही सभागृहाचा सदस्य नसताना ६ महिने मंत्रिपदी राहू शकतो. फक्त विरोधी पक्षाचा सदस्य असताना त्याला मंत्री होता येत नाही' असं प्रत्युत्तर दिलं.हेही वाचा -

अंधेरी गोखले पूलाची पादचारी मार्गिका अखेर सुरू

पावसाळी अधिवेशनात २८ विधेयकांवर होणार चर्चासंबंधित विषय
ताज्या बातम्या