Advertisement

पावसाळी अधिवेशनात २८ विधेयकांवर होणार चर्चा

राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात १३ नवीन विधेयक आणि विधानसभेतील प्रलंबित १२, विधान परिषदेतील प्रलंबित ३ अशी एकूण २८ विधेयक चर्चेला येणार आहेत.

पावसाळी अधिवेशनात २८ विधेयकांवर होणार चर्चा
SHARES

राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडला जाणारा अर्थसंकल्प हा पुरोगामी आणि राज्याला पुढे नेणारा असणार आहे. तसंच अधिवेशनात राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही चर्चा होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. या अधिवेशनात १३ नवीन विधेयक आणि विधानसभेतील प्रलंबित १२, विधान परिषदेतील प्रलंबित ३ अशी एकूण २८ विधेयक चर्चेला येणार आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री राज्य अतिथीगृह इथं झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. त्याशिवाय राज्यात दुष्काळ परिस्थिती असल्यानं अधिवेशनात या दुष्काळावर चर्चा करण्यात येणार आहे.

दुष्काळावर चर्चा

आतापर्यंत शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर ४ हजार ७०० कोटी रुपये अनुदान वितरित करण्यात आलं आहे. तसंच, हजार २०० कोटी रुपयांचा पिकविमा वितरित करणं सुरू आहे. प्रधानमंत्री किसान योजनेत राज्यातील १ कोटी २० लाख शेतकऱ्यांचा समावेश असणार आहे. त्यांची माहिती अद्ययावत करण्याचं काम युध्द पातळीवर सुरू आहे. त्यांच्या खात्यातही खरिपापूर्वी रक्कम जमा होणार आहे. दुष्काळी भागात आवश्यक त्या ठिकाणी चारा छावण्या उभारण्यात आल्या. जनावरांसाठी पालनपोषणाच्या दरात भरीव वाढ करण्यात आली. पहिल्यादाच राज्यात २ ठिकाणी छोट्या जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्यात आल्या आहेत. जनावरांचे टॅगिंग केल्यानं चारा छावणीच्या नावाखाली होणारा भ्रष्टाचार रोखण्यात येत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

आश्वासनाचं प्रतिबिंब

गेली ५ वर्ष सर्व समाजाला समोर ठेवून निर्णय घेतले. आव्हानांना सकारात्मकतेनं पुढे गेल्यामुळं जनतेनं विश्वास दाखविला. प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहोत. मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक पाऊले उचलल्याने वैद्यकीय प्रवेश क्षमतेत वाढ करण्यात यश आलं आहे. धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाचं प्रतिबिंब येत्या अर्थसंकल्पात दिसेल. मंत्रिमंडळात नव्यानं समावेश झालेल्या मंत्र्यांसह यापुढेही अधिक जबाबदारीनं चांगले काम करू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

कामाकाजाचं स्वरुप

सोमवारपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा सदस्यत्वाच्या राजीनाम्याची घोषणा, मंत्र्यांचा परिचय, अध्यादेश पटलावर मांडणं आणि शोकप्रस्ताव असं दिवसभराच्या कामाकाजाचं स्वरुप राहणार आहे.



हेही वाचा -

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर खाते वाटप जाहीर, पाहा कोणाला कोणतं खातं?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा