राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर खाते वाटप जाहीर, पाहा कोणाला कोणतं खातं?

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर रविवारी पार पडला. या मंत्रिमंडळाच्या विस्तारात एकूण १३ नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. तसंच, विद्यमान ६ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं.

SHARE

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर रविवारी पार पडला. या मंत्रिमंडळाच्या विस्तारात एकूण १३ नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. तसंच, विद्यमान ६ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं. त्यानंतर, रात्रीच या नव्या मंत्र्यांचं खातेवाटपही जाहीर करण्यात आलं. ४ महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या असून त्याआधीचा हा अखेरचा मंत्रिमंडळ विस्तार आहे.

काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडं डच्चू दिलेल्या प्रकाश मेहता यांचं गृहनिर्माण खातं सोपवण्यात आलं आहे. तर विनोद तावडे यांच्याकडील शालेय शिक्षण खाते काढून घेत त्याची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडं सोपवण्यात आली आहे.

आशिष शेलार हे नवे शालेय शिक्षण मंत्री असून, तर अमरावतीचे भाजप आमदार डॉ. अनिल बोंडे यांच्यावर कृषी खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याशिवाय राष्ट्रवादीतून काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत आलेले व बीडच्या राजकारणातील वजनदार नेते मानले जाणारे जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री करण्यात आले आहे.

मंत्रिमंडळ खातेवाटप

कॅबिनेट मंत्री 

 • राधाकृष्ण विखे पाटील - गृहनिर्माणजयदत्त क्षिरसागर - (जिल्हा - बीड) रोजगार हमी व फलोत्पादन
 • आशिष शेलार (जिल्हा - मुंबई) (भाजप) - शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण
 • डॉ. संजय कुटे (जिल्हा - बुलढाणा) ( भाजप) कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागसवर्ग कल्याण
 • डॉ. सुरेश खाडे (जिल्हा - सांगली) (भाजप) - सामाजिक न्याय विभाग
 • डॉ. अनिल बोंडे (जिल्हा - अमरावती) (भाजप) - कृषी
 • डॉ. अशोक उईके (जिल्हा - यवतमाळ) (भाजप) - आदिवासी विकास
 • डॉ. तानाजी सावंत (जिल्हा यवतमाळ) (शिवसेना) - जलसंधारण
 • राम शिंदे-पणन व वस्त्रोद्योग
 • संभाजी पाटील निलंगेकर- अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास, माजी सैनिकांचे कल्याण
 • जयकुमार रावळ- अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार
 • सुभाष देशमुख- सहकार आणि मदत व पुनर्वसन


राज्यमंत्री

 • योगेश सागर (जिल्हा - मुंबई) (राज्य मंत्री) (भाजप) - नगरविकास राज्यमंत्री
 • अविनाश महातेकर (जिल्हा - मुंबई ) (आरपीआय) - सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री
 • संजय भेगडे ( जिल्हा - पुणे) (भाजप) - कामगार,पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन
 • डॉ. परिणय फुके (जिल्हा - भंडारा) ( भाजप) - सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास व वने राज्यमंत्री
 • अतुल सावे (जिल्हा औरंगाबाद) ( भाजप) - उद्योग आणि खनीकर्म अल्प संख्याक आणि वख्फ राज्यमंत्री

हेही वाचा -

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात 'या' नेत्यांचा समावेशसंबंधित विषय
ताज्या बातम्या