किंग्ज सर्कल, वांद्रे स्थानकात टीसीला मारहाण


किंग्ज सर्कल, वांद्रे स्थानकात टीसीला मारहाण
SHARES

एकाच दिवशी रेल्वेच्या २ तिकीट तपासनीसांना रेल्वे स्थानकांमध्ये मारहाण केल्याची घटना किंग्ज सर्कल आणि वांद्रे स्थानकांवर घडली आहे. मंगळवारी ही घटना घडली असून, दोन्ही घटनांमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या अरेरावीमुळं तिकीट तपासनीसांना मारहाण करण्यात आली आहे. तिकीट तपासनीसांना मारहाण केल्यानं प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करण्याऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळं अशा प्रवाशांवर रेल्वे पोलिस कारवाई करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

तिकिटांची विचारणा

मंगळवारी हार्बर मार्गावरील गोरेगाव स्थानकातून तौफीक कुरेशी आणि अन्सारी प्रवास करत होते. संध्याकाळी ४.३० वाजताच्या सुमारास हे दोन्हा प्रवासी किंग्ज सर्कल स्थानकात उतरले. स्थानकातून जात असताना तिकीट तपासनीस हरेराम शर्मा यांनी या दोन्ही प्रवाशांकड तिकिटांची विचारणा केली. मात्र, त्यांनी उडवाउडवीची कारणं दिली. शर्मा यांनी दंड भरण्यास सांगितलं. मात्र, त्यांनी शर्मा यांना रेल्वे रुळांवर फेकले.

रुग्णालयात उपचार

या घटनेमध्ये शर्मा यांच्या हाताला आणि पाठीला मार लागला आहे. त्यांच्यावर भायखळा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी पकडलं आहे. तसंच, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनातिकीट प्रवास

वांद्रे स्थानकात तिकीट तपासनीस विवेक रॉय यांना सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास एक प्रवासी विनातिकीट प्रवास करून वांद्रे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर उतरला. तिकीट नसतानाही त्या प्रवाशानं रॉय यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. या प्रवाशानंही तिकीट तपासनीसाला धक्का दिला. त्यामुळं हे रॉय ते रुळांवर पडले. या प्रकरणी अज्ञाताविरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून, आरोपीचा तपास घेतला जात आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा