Advertisement

चोरीला गेलेला मोबाइल ब्लाॅक करता येणार, सरकारने दिली सुविधा

आता मोबाइल चोरीला गेल्यास घाबरण्याचं कारण नाही. कारण यासाठी आता सरकारनेच एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

चोरीला गेलेला मोबाइल ब्लाॅक करता येणार, सरकारने दिली सुविधा
SHARES

मोबाइल चोरीला गेल्यास अनेकांना मोठा धक्का बसतो. कारण मोबाइलमध्ये खासगी फोटो, चॅट आणि अनेक फोन क्रमांक असतात. याचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याने मोबाइल चोरी होणं हे मोठं तापदायक असतं. मात्र, आता मोबाइल चोरीला गेल्यास घाबरण्याचं कारण नाही. कारण यासाठी आता सरकारनेच एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

चोरीला गेलेला मोबाइल आता आपल्याला ब्लाॅक करता येणार आहे. दूरसंचार विभाग आणि पोलिसांना मिळून यासाठी  ceir.gov. in ही वेबसाईट बनवली आहे. या वेबसाइटचं उद्घाटन दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केलं आहे. मोबाइल ब्लाॅक करण्याच्या सेवेची चाचणी सप्टेंबरपासून सुरू होती. आता दिल्ली आणि मुंबईत ही सेवा सुरू झाली आहे. हे तंत्रज्ञान सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्सने विकसित केलं आहे. त्याद्वारे हरवलेला मोबाइल शोधता येईल. 

मोबाइल हरवल्यास ब्लॉक केल्यावर तुम्हाला तुमचा फोन पुन्हा मिळाला तर तो तुम्ही अनब्लॉक सुद्धा करु शकतात. यासाठी तुम्हाला रिक्वेस्ट आयडी आणि ब्लॉक करताना दिलेल्या मोबाइल नंबरची माहिती द्यावी लागणार आहे. ओटीपी मिळाल्यावर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमचा फोन अनब्लॉक करण्याची विनंती पोहोचेल आणि मग अनब्लॉक करण्यात येईल.


असा करता येईल मोबाइल ब्लाॅक 

  • पहिल्यांदा तुम्हाला आयएमईआय नंबर ब्लॉक करण्यासाठी ceir.gov.in वेबसाईटवर जावे लागणार आहे. 
  • या ठिकाणी तुम्हाला चोरी झालेला किंवा हरवलेल्या मोबाइलला ब्लॉक करण्याचे पर्याय उपलब्ध असतील. 
  • या पर्यायावर क्लिक करताच एक नवं पेज ओपन होईल जेथे तुम्हाला काही माहिती भरावी लागणार आहे. 
  • या ठिकाणी मोबाइल फोनमधील दोन्ही फोन नंबर, फोनचे दोन्ही आयएमईआय, मोबाइल कुठल्या कंपनीचा आहे, मोबाइलचं कुठलं मॉडल आहे ही माहिती भरावी लागणार आहे.
  • यानंतर तुम्हाला तुमचा फोन नेमका कुठे हरवला त्याचं लोकेशन द्यावं लागणार आहे. फोन हरवल्याची तारीख, राज्य, जिल्हा, पोलीस स्टेशन, पोलीस तक्रार क्रमांक, तक्रार दाखल केल्याचा फोटो अपलोड करावा.
  • यासोबतच मोबाइल मालकाचं नाव, आयडी, पत्ता, मोबाइल नंबर, ईमेल आयडी याची माहिती द्यावी लागणार. ओटीपीसाठी तुम्हाला एक वेगळा नंबर द्यावा लागणार आहे आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा.



हेही वाचा -

SBI कडून नवीन वर्षाची भेट, गृहकर्ज दरात कपात

क्रेडिट कार्डऐवजी डेबिट कार्ड का वापरावे? जाणून घ्या...




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा