'व्हायग्रा'च्या नावाखाली मुंबईतून अमेरिकन नागरिकांना कोट्यावधी रुपयांना गंडा

व्हायग्रा, सियलीस, मेटाडोर या सारख्या प्रतिबंंधक गोळ्या नाममात्र किमतीत उपलब्ध करून देण्याच्या आमिषाला गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक अमेरिकन नागरिक भुलले

'व्हायग्रा'च्या नावाखाली मुंबईतून अमेरिकन नागरिकांना कोट्यावधी रुपयांना गंडा
SHARES

व्हायग्रासारख्या अमेरिकेत (America) प्रतिबंधित असलेल्या औषधांचा साठा स्वस्तात घरपोच मिळण्याच्या आमिषाला भुललेल्या अमेरिकी नागरिकांकडून क्रेडिट-डेबिट कार्डाचे(Debit-Credit card) तपशील घेऊन त्यांना आर्थिक गंडा घालणाऱ्या टोळीचा मुंबईच्या गुन्हे शाखा (Mumbai craim branch) 10 च्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मुदस्सर मकानदार (34), अँशिल डिसोजा (38)   अशी या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्या हाताखाली 22 कर्मचारी काँलसेंटरमध्ये कार्यरत होते. अंधेरी(Andheri)च्या  मरोळ परिसरात हे अवैध कॉल सेंटर नुकतेच पोलिसांनी उद्ध्वस्त केल्याची माहिती गुन्हे शाखा 10 चे अधिकारी सुनिल माने यांनी दिली.


अमेरिकेत प्रतिबंधक असलेल्या औषधांची   विक्री सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा 10 च्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अंधेरी मरोळ येथील  ए.एम.कॉल कनेक्ट या कंपनीच्या सेंटवर छापा मारला. या कॉल सेंटरच्या माध्यमातून व्हायग्रा(viagra), सियलीस  (cialis), मेटाडोर या सारख्या प्रतिबंंधक गोळ्या नाममात्र किमतीत उपलब्ध करून देण्याच्या आमिषाला गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक अमेरिकन नागरिक भुलले. ज्यांनी या गोळ्या मागवल्या त्यापैकी एखाददुसऱ्यालाच प्रत्यक्षात गोळ्या पोहोचत्या केल्या गेल्या. उर्वरित सर्वाकडून आगाऊ पैसे उकळून गंडवण्यात आले, अशी माहिती अटकेत असलेल्या आरोपींच्या चौकशीतून पुढे आली.


या टोळीने आतापर्यंत लाखो रूपयांना गंडा घातला आहे.पोलिसांनी मिळालेल्या माहितीनंतर या कॉलसेंटर धाड मारली असता त्याठिकाणी 22 इसम संगणकाला जोडलेला हेडफोन माईकवरुन विओ, आयपी, आटो डायलच्या  माध्यमातून अमेरिकेतील नागरिकांशी संपर्क साधून औषध विक्रीच्या बहाण्याने डॉलरमध्ये पैसे घेत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून राउटर सर्वर, कनेक्टर, संगणक, माइक, मोबाइल असं साहित्य जप्त केलं आहे. या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांची 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. कॉल सेंटरच्या प्रमुखाला दर महिन्याला अमेरिकन नागरिकांचे तपशील म्हणजे नाव, संपर्क क्रमांक न चुकता मिळत होते. तो ते विकत घेत असावा, असा अंदाज गुन्हे शाखेकडून वर्तविण्यात येतो. या तपशिलांआधारे मध्यरात्री कॉल सेंटरचे ११ कर्मचारी सुमारे पाचशे ते हजार अमेरिकन नागरिकांना संपर्क साधून व्हायग्रा स्वस्तात घरपोच पोहोचते करण्याचे आमिष दाखवत. संपर्क साधणारे कर्मचारी मुंबईचे रहिवासी, शिक्षण अर्धवट सोडलेले, मात्र इंग्रजीवर प्रभुत्व असलेले तरुण आहेत. अमेरिकेतूनच दूरध्वनी आला आहे, हे भासवण्यासाठी परदेशी मोबाइल क्रमांक, बनावट नावे, अमेरिकन उच्चारात संवाद, अशी तयारी कॉल सेंटरमध्ये होती.

Read this story in हिंदी
संबंधित विषय