Advertisement

प्रजासत्ताक दिनाबद्दल जाणून घ्या या १० गोष्टी


प्रजासत्ताक दिनाबद्दल जाणून घ्या या १० गोष्टी
SHARES

२६ जानेवारी हा भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. शाळेत असताना प्रजासत्ताक दिनी स्वच्छ गणवेश आणि बूट घालून शाळेत जायचो. झेंडावंदन झालं की सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. पण जसजसं आपण मोठे होत गेलो तसतसं प्रजासत्ताक दिनाची व्याख्या बदलत गेली. आता बहुतांश नागरिक प्रजासत्ताक दिनाकडे एक हॉलिडे म्हणून बघतात. पण आजही बरेच जण आपल्या परिसरात म्हणा किंवा सोसायटीमध्ये म्हणा प्रजासत्ताक दिन साजरा करतात. पण या प्रजासत्ताक दिनामागे काही तथ्य आहेत, जी प्रत्येक भारतीयाला माहित असणं गरजेचं आहे.

१) जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.

२) १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी हा दिवस देखील इतिहासाच्या आठवणींमध्ये जपून ठेवायचा होता. कारण या दिवशी स्वराज्याच्या घोषणेमुळे आजचा हा स्वातंत्र्याचा दिवस लाभला आहे.

३) पहिला प्रजासत्ताक दिन हा २६ जानेवारी १९५० रोजी साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास तीन वर्षांनी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला होता.

४) पहिल्या प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम तीन दिवस चालला. २९ जानेवारीच्या बीटिंग रिट्रीट सोहळ्यासह प्रजासत्ताक दिनाची सांगता झाली.

५) प्रजासत्ताक दिनाची पहिली परेड १९५५ मध्ये राजपथावर आयोजित करण्यात आली होती.

६) अबाईड विथ मी हे इंग्रजी गाणं प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये वाजवण्यात आलं होतं. हे महात्मा गांधींचं आवडतं गाणं आहे.

७) भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान असून इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये लिहण्यात आले आहे. यामध्ये एकूण ४४८ कलम आहेत.

८) भारताचे संविधान तयार करणे हे सर्वात मोठे आणि बुद्धीचे कार्य होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी २ वर्ष ११ महिने घेतले.

९) आपल्या नेत्यांनी इतर देशांच्या संविधानांमधून काही सर्वोत्तम पैलू उचलले. स्वातंत्र्य, बंधुता आणि समता या संकल्पना फ्रेंच संविधानातून आल्या. तर पंचवार्षिक योजना ही यूएसएसआरच्या संविधानातून आली.

१०) भारताचे संविधान लागू होण्यापूर्वी भारत ब्रिटिश सरकारच्या १९३५ वा कायद्याचे अनुसरण करत होती.


हेही वाचा

मानसिक आरोग्यावर भाष्य करणारी 'बोलकी भिंत'

संबंधित विषय
Advertisement