Advertisement

मानसिक आरोग्यावर भाष्य करणारी 'बोलकी भिंत'

वास्तविक, मनोव्याधी या बऱ्या होतात. पण समाजातील अपसमजामुळे त्यावर वेडेपणाचा शिक्का लावला जातो. त्यामुळे समाजानं आपला दृष्टीकोन बदलणं आवश्यक आहे, हा संदेश देण्यासाठी चल रंग दे आणि एमपावर तर्फे पुढाकार घेण्यात आला आहे.

मानसिक आरोग्यावर भाष्य करणारी 'बोलकी भिंत'
SHARES

मेंदू हा हृदय आणि यकृतासारखाच शरीराचा एक अवयव. कोणत्याही अवयवाला होतो तसा म्हणजे मधुमेह, रक्तदाबासारखाच विकार मेंदूलाही होऊ शकतो. तो विकार लाजिरवाणा नाही. त्यात रुग्णाचा दोष नसतो. म्हणूनच मनोरुग्णाला औषधोपचार करण्याची आणि माणूस म्हणून सन्मानानं जगायला मदत करण्याची आवश्यकता आहे, हाच संदेश देण्यासाठी 'चल रंग दे' आणि 'एम पावर'च्या टीमनं पुढाकार घेतला आहे

वांद्रेमधल्या एसव्हीरोड इथली भिंत सध्या वेगवेगळ्या रंगानी बहरली आहे. जवळपास मुंबईतल्या १८० वॉलेंटियर्सनी एकत्र येत मानसिक आरोग्याबाबत जनजागृती केली. यानिमित्त भिंतींवर वेगवेगळी चित्रे साकारण्यात आली आहेत. या चित्राच्या माध्यमातून मानसिक विकार हा कुठला आजार नाही आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.


याशिवाय वास्तविक, मनोव्याधी या बऱ्या होतात. पण समाजातील अपसमजामुळे त्यावर वेडेपणाचा शिक्का लावला जातो. कारण मनोव्यथा लपवून ठेवल्या जातात आणि त्याची तीव्रता वाढत जाते. सर्वात महत्त्वाचं हे मानसिक आजार वेळीच हुडकून काढणं, अत्यंत महत्त्वाचं असतं. मनाच्या गाभाऱ्यात त्याचं मूळ रुजण्याआधी ते उपटून काढलं तर त्या व्याधीतून मुक्तता होणं सोपं जातं, हे या चित्रांच्या माध्यमातून मांडण्यात आलं आहे.


चल रंग दे आणि एम पावरच्या टीमनं एकत्र येत ही संकल्पना राबवली. १८० वॉलेंटियर्सनी एकत्र येत तीन दिवसात या भिंतीचं रुपडं पालटलं. १८० वॉलेंटियर्समध्ये लहानग्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच सहभाग नोंदवला.   



हेही वाचा

मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन बनले आर्ट गॅलरी

खारदांडातल्या घरांनी कात टाकली!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा