Advertisement

खारदांडातल्या घरांनी कात टाकली!

'चल रंग दे' टीमनं सुरू केलेल्या उपक्रमांंतर्गत खारदांडा इथल्या घरांचा कायापालट झाला आहे. तुम्ही देखील हा मेकओव्हर पाहून चकित व्हाल!

खारदांडातल्या घरांनी कात टाकली!
SHARES

'चल रंग दे' टीमनं सुरू केलेल्या उपक्रमांंतर्गत खारदांडा इथल्या घरांचा कायापालट झाला आहे. तुम्ही देखील हा मेकओव्हर पाहून चकित व्हाल!




'चल रंग दे'चं मिशन खार 

घाटकोपरच्या असल्फा व्हिलेज चं रुपडं पालटल्यानंतर चल रंग दे टीम पुन्हा एकदा जोमानं कामाला लागली आहे. यावेळी 'चल रंग दे'नं खारदांडा इथल्या घरांचा पूर्णपणे कायापालट केला आहे. 'चल रंग दे'च्या टीमसोबतच २८०० हून अधिक स्वयंसेवकांनी आणि काही स्थानिकांनी जवळपास १० दिवस यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यांनी घेतलेल्या मेहनतीनंतरच आज खारदांडा इथला परिसर इंद्रधनुषी रंगांमध्ये रंगला आहे!



खारदांडा इथल्या ४०० घरांच्या १२०० भिंती वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगून गेल्या आहेत. यापैकी ४४ भिंतींवर वॉल आर्ट साकारण्यात आले आहे. पेंटिंग आणि वॉल आर्ट याशिवाय 'चल रंग दे' टीमनं एक हटके संकल्पना देखील राबवली. यावेळी त्यांनी प्रत्येक घरावर सस्टेनेबल रूफटॉप लावले. त्यानंतर हे रूफटॉप रंगवण्यात आले. आत्तापर्यंत ३०० रूफटॉप लावण्यात आले आहेत.



सस्टेनेबल रुफटॉप हा नवीन प्रकार असून त्याचे अनेक फायदे आहेत. उन्हाळ्यात रूफटॉप प्रचंड तापतात. त्यामुळे घराच्या आत देखील गरम होतं. सस्टेनेबल रूफटॉपमुळे घरातील ३ ते ४ अंश सेल्सियस इतक्या तापमानात घट होईल. पावसाळ्यात इथले रहिवासी घरांवर ताडपत्री टाकतात. पण आता सस्टेनेबल रूफटॉपमुळे त्यांना ताडपत्रीची आवश्यकता नाही. कारण यामुळे छत लीकेज होऊन घरात पाणी गळण्याची संभावनाच नाही. शिवाय या सस्टेनेबल रूफटॉपमुळे इथल्या घरांचा वेगळाच लुक पाहायला मिळत आहे.




असल्फा व्हिलेजचा कायापालट केल्यानंतर आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. फक्त स्वयंसेवकांनीच नाही तर खारदांडा परितरातल्या स्थानिकांनी देखील या उपक्रमात पुढाकार घेतला. मुंबई विमानतळावरून टेकऑफ करणाऱ्या विमानातून सर्वात पहिली दिसणारी गोष्ट म्हणजे हा खारदांडा परिसर. त्यामुळे आम्ही या परिसराला आकर्षित करण्याचा निर्णय घेतला.

देदिपिया रेड्डीसह संस्थापकचल रंग दे




'चल रंग दे' मोहिमेला स्वयंसेवकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. जवळपास १० दिवस चाललेल्या या उपक्रमात २८०० हून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. तर ४५०० हून अधिक स्वयंसेवकांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंद केला होती. एकूण ५२ आर्टिस्ट्सनी ४४ भिंतींवर वॉल आर्ट साकारले आहे.


 


घाटकोपरचा असल्फा व्हिलेज, खारदांडा यानंतर मुंबईतल्या अनेक परिसरांचा कायापालट करण्याचा निर्धार त्यांनी केली आहे




हेही वाचा

स्टेशनबाहेर अवतरली मेट्रो!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा