Advertisement

चल रंग दे... मुंबईचं रुपडं पालटणार


SHARES

मुंबईतील झोपडपट्टी म्हटलं की डोळ्यासमोर एकच चित्र उभं राहतं आणि ते म्हणजे घाण, उकिरडा आणि ओबडधोबड घरं. पण तुम्हाला लवकरच तुमचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. कारण आम्ही तुम्हाला दाखवत असलेल्या या झोपडपट्टीचा पूर्ण कायापालट झाला आहे!



सप्तरंगांनी सजलेली ही घरं घाटकोपरमधल्या 'असल्फा व्हिलेज' इथली आहेत. या घरांचे रुपडे पालटण्यासाठी 'चल रंग देही मोहीम राबवण्यात आली. फ्रुटबोल डिजीटल या कंपनीनं मुंबई मेट्रो वनस्नोसॅम पेंट्स यांच्यासोबत मिळून हा उपक्रम सुरू केला. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक घराला एक वेगळा आणि डार्क रंग देण्यात आला आहे. हिरवा, पिवळा, निळा असे उठून दिसणारे रंग घरांना देण्यात आले आहेतत्यामुळे असल्फा मेट्रो स्टेशनवरून ही घरं आकर्षक दिसतात.



तीन दिवस चाललेल्या या मोहिमेअंतर्गत जवळपास १२० हून अधिक भिंती रंगवण्यात आल्या. ३०० ते ४०० तरूण-तरूणींनी यात सहभाग घेतला होता. एवढेच नाही, तर स्थानिकांनी देखील या मोहिमेत आपला सहभाग दर्शवला. काही दिवसांतच हा उपक्रम संपूर्ण मुंबईत राबवला जाणार आहे. त्यामुळे लांबून बघताना ही घरं सतरंगी रंगात बुडालेली दिसतील.



उपक्रमामागील नेमका हेतू

झोपडपट्ट्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा, घाण, नाले अशी झोपडपट्ट्यांची असलेली ओळख पुसली जावी, हाच या उपक्रमामागचा हेतू आहे. शिवाय, या मोहिमेअंतर्गत मुंबईतल्या सर्व झोपडपट्टींचे रूपडे पालटणार आहे. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीनं हे अधिक फायदेशीर ठरेल.





हेही वाचा

धारावीतील टाटा पॉवरची जागा होणार मोकळी, झोपड्यांच्या जागी गार्डनचा प्रस्ताव!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा