Advertisement

स्टेशनबाहेर अवतरली मेट्रो!

'रिलायन्स मुंबई मेट्रोवन प्रा. लि. कंपनी'नं 'माझी मेट्रो' या फेस्टिव्हलला सुरुवात केली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जोमात या फेस्टिव्हलला सुरुवात झाली. 'आर्ट इन मोशन' ही यावर्षीच्या माझी मेट्रो फेस्टिव्हल २०१८ ची थीम आहे. २१ दिवस चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये अनेक कार्यक्रम राबवले जातात. त्यापैकी त्यांचा पहिला कार्यक्रम 'आर्ट बाय पीपल' पार पडला.

स्टेशनबाहेर अवतरली मेट्रो!
SHARES

मुंबईकरांच्या आकर्षणाचा विषय बनलेल्या मेट्रो वननं मुंबईकरांच्या जीवनात एक भावनिक स्थान निर्माण केलं आहे. याच प्रयत्नांतून 'रिलायन्स मुंबई मेट्रोवन प्रा. लि. कंपनी'नं 'माझी मेट्रो' या फेस्टिव्हलला सुरुवात केली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जोमात या फेस्टिव्हलला सुरुवात झाली. 'आर्ट इन मोशन' ही यावर्षीच्या माझी मेट्रो फेस्टिव्हल २०१८ ची थीम आहे. २१ दिवस चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये अनेक कार्यक्रम राबवले जातात. त्यापैकी त्यांचा पहिला कार्यक्रम 'आर्ट बाय पीपल' पार पडला.



लाईफ इन मेट्रो

'आर्ट बाय पीपल' या टॅगलाईन अंतर्गत माझी मेट्रोचा पहिला इव्हेंट नुकताच पार पडला. या अंतर्गत अंधेरीतल्या डी.एन. नगर इथल्या मुंबई मेट्रो हेडक्वार्टरच्या भिंतीचं रुपडं पालटलं आहे. ४ हजार २६० चौरस फूट लांबीच्या भिंतीवर 'लाइफ इन मेट्रो' या थीमवर आधारीत ग्राफिटी काढण्यात आली आहे.



३१ मार्चपासून 'माझी मेट्रो' या फेस्टिव्हलच्या पहिल्या इव्हेंटला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी म्हणजेच ३१ मार्चला जवळपास ८६ मुंबईकरांनी यात सहभाग नोंदवला. रविवार आणि सोमवार या दोन दिवशी देखील मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद होता. अनेक आर्टिस्ट यात सहभागी झाले होते.



असल्फा व्हिलेजचा कायापालट करणाऱ्या फ्रूटबोल डिजीटल या कंपनीनं माझी मेट्रो फेस्टिव्हलची जबाबदारी उचलली आहे. गेल्या वर्षी मुंबई मेट्रो आणि फ्रूटबोल डिजीटल यांनी एकत्र येत घाटकोपरच्या असल्फा व्हिलेजमध्ये चल रंग दे मोहीम राबवली होती.


माझी मेट्रोची खासियत

मुंबईकरांच्या सेवेत येण्याआधी म्हणजेच २०१३ पासूनच एमएमओपीएलनं 'माझी मेट्रो' (माय मेट्रो माय स्टोरी) फेस्टिव्हल सुरू केला. या फेस्टिव्हल अंतर्गत मेट्रोविषयी मुंबईकरांना वाटणाऱ्या भावना पेंटिंग्स, फोटोग्राफ्स आणि काव्य या स्वरूपात मांडण्याच्या स्पर्धा घेण्यात येतात. यंदा ३१ मार्च २०१८ पासून या फेस्टिव्हलला सुरुवात झाली. या फेस्टिव्हलमध्ये फोटोग्राफी वर्कशॉप, काव्यलेखन कार्यशाळा याचं देखील आयोजन करण्यात येतं. यावर्षी असल्फा व्हिलेज, वर्सोवा बीच, कोळी व्हिलेज, घाटकोपर खाऊगल्ली या ठिकाणी फोटो वॉकचं आयोजन करण्यात आलं आहे.



'माझी मेट्रो' या फेस्टिव्हलमुळे कलाकारांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध होतं. स्पर्धकांची कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मेट्रो स्टेशनमध्ये त्यांच्या पेंटिंग्स आणि फोटोंचं प्रदर्शन देखील भरवण्यात येतं. या फेस्टिवलमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या उत्कृष्ट कलाकृतीला बक्षीस देण्यात येतं. जर तुम्हाला देखील आपली कला दाखवण्यासाठी एका व्यासपीठाची आवश्यकता असेल, तर तुम्ही http://majhimetro.in/ या वेबसाईटला भेट देऊ शकता.


हेही वाचा

चल रंग दे... मुंबईचं रुपडं पालटणार


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा