गुढी पाडव्याला शिवाजी पार्कमध्ये होणार राज ठाकरेंची सभा

मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरेंच्या सभेच्या तयारीला लागल्याचे चित्र सध्या दिसतं आहे. ६ एप्रिल रोजी म्हणजेचं गुढी पाढव्याला दादरमधील शिवाजी पार्क येथे राज ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यामुळं या सभेमध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

गुढी पाडव्याला शिवाजी पार्कमध्ये होणार राज ठाकरेंची सभा
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी अगोदरचं स्पष्ट केलं आहे. मात्र, राज ठाकरे लोकसभा निवडणूक लढवणार नसले तरी, मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरेंच्या सभेच्या तयारीला लागल्याचं चित्र सध्या दिसत आहे. ६ एप्रिल रोजी म्हणजेचं गुढी पाडव्याला दादरमधील शिवाजी पार्क इथं राज ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यामुळं या सभेमध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.


फेसबुकवर पोस्ट

या सभेबाबत मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून एक पोस्टर शेअर केला आहे. यामध्ये ‘गुढी पाडव्यापासून देशात नवं ‘राज’पर्व!’ असं लिहिण्यात आलं आहे. तसंच, 'निवडणूक येतात आणि जातात! पण अशी सभा होणे नाही!’ असं देखील लिहिण्यात आलं आहे. त्याशिवाय या पोस्टरवर राज ठाकरेंसह शालिनी ठाकरेंचाही फोटो आहे.
नवीन राजकीय पर्व

या सभेतून राज ठाकरे देशाला मोदी-शहा यांच्या हुकुशाहीविरोधात एक नवीन विचार देणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच, या विचारातून देशात एक नवीन राजकीय पर्व निर्माण होणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे. ही सभा यशस्वी व्हावी यासाठी मनसेचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते काम करत असल्याचं समजतं आहे.


काय बोलणार?

राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिनी 'माझ्या सर्व सभा मोदी-शहा विरुद्ध होतील', असं म्हटलं होतं. त्यामुळं गुढी पाडव्यादिवशी शिवाजी पार्क इथं राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. तसंच, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि मनसेमध्ये ट्विटवर वाद सुरु आहेत. त्यामुळं राज ठाकरे सभेमध्ये आशिष शेलारांविरुद्ध बोलणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.हेही वाचा -

हिमालय पूल दुर्घटना : पालिकेच्या सहाय्यक अभियंत्याला ५ एप्रिलपर्यंत कोठडी

लालबाग-परळ गिरणगावच्या शोभायात्रेत स्त्री शक्तीचा जागरसंबंधित विषय