हिमालय पूल दुर्घटना : पालिकेच्या सहाय्यक अभियंत्याला ५ एप्रिलपर्यंत कोठडी


हिमालय पूल दुर्घटना : पालिकेच्या सहाय्यक अभियंत्याला ५ एप्रिलपर्यंत कोठडी
SHARES

सीएसटीएमटी येथील हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी सोमवारी मुंबई महापालिकेचे सहाय्यक अभियंता एस.एफ. काकुळते यांना अटक केली होती. काकुळते यांना पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.  हिमालय पुलाची दुरूस्ती काकुळते यांच्या देखरेखीखाली झाली होती. 


मोठा भ्रष्टाचार

महापालिकेच्या मुख्यालयापासून जवळ असलेला हिमालय पूल १३ मार्च रोजी सायंकाळी कोसळला.  या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला. तर ३१ जण जखमी झाले. याप्रकरणी या पूलाच्या आॅडिटचे काम दिलेल्या "डीडी देसाई असोसिएट इंजिनिअर कन्सलटन्सी अँड अॅनालाइस्ट प्रा. लिमिटेड या कंपनीचे संचालक  निरज देसाई यांना याआधीच अटक केली आहे. २०१३-१४ मध्ये या पूलाच्या दुरूस्तीचे काम काकुळते यांच्या देखरेखीखाली झाले होते. त्यामुळे या दुर्घटनेस जबाबदार धरत काकुळते यांना सोमवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. अटकेचे सत्र काकुळते यांच्यापर्यंतच मर्यादित नसून या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाला असून अटक आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.



हेही वाचा -

हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी सहाय्यक अभियंत्याला अटक



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा