हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी सहाय्यक अभियंत्याला अटक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणाऱ्या हिमालय पुलाच्या दुर्घटनेप्रकरणी सोमवारी मुंबई महापालिकेचे सहाय्यक अभियंता एस.एफ काकुळते यांना अटक केली. हिमालय पुलाची देखभाल काकुळते यांच्या देखरेखीखाली झाली होती.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणाऱ्या हिमालय पुलाच्या दुर्घटनेप्रकरणी सोमवारी मुंबई महापालिकेचे सहाय्यक अभियंता एस.एफ काकुळते यांना अटक केली. हिमालय पुलाची देखभाल काकुळते यांच्या देखरेखीखाली झाली होती.

SHARE

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणाऱ्या हिमालय पुलाच्या दुर्घटनेप्रकरणी सोमवारी मुंबई महापालिकेचे सहाय्यक अभियंता एस.एफ काकुळते यांना अटक केली. हिमालय पुलाची देखभाल काकुळते यांच्या देखरेखीखाली झाली होती. या प्रकरणातील ही आतापर्यंतची दुसरी अटक असल्याची माहिती पोलिस प्रवक्ते मंजुनाथ शिंगे यांनी दिली. या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाला असून अटक आरोपींची संख्या वाढण्याची शक्यताही पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


पोलिसांत गुन्हा दाखल

महापालिका मुख्यालयापासून जवळ असलेला हिमालय पूल १४ मार्च रोजी सायंकाळी कोसळला. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला. तर ३१ जण जखमी झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी आझाद मैदान पोलिसांत  गुन्हा नोंदवला होता. तपासात पुलाच्या आॅडिटचं काम डी .डी. देसाई असोसिएट्स कंपनीकडे असल्याची माहिती पुढे आल्यानंतर कंपनीचे प्रमुख नीरज देसाईंना अटक करण्यात आली.

तसंच या दुर्घटनेचा अहवाल २४ तासांत सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर महापालिकेनं या दुर्घटनेचा अहवाल सादर केला. या अहवालात ज्या 'डी.डी. देसाई असोसिएट इंजिनिअर कन्सलटन्सी अँड अॅनालाइस्ट प्रा. लिमिटेड' कंपनीला ऑडिटचं काम दिलं होतं. त्या कंपनीनं या पुलामध्ये किरकोळ दुरूस्ती असून पूल पादचाऱ्यांच्या रहदारीसाठी धोकादायक नसल्याची चुकीची माहिती महापालिकेला दिल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं. 


महापालिकेचा अहवाल

या २०१७-१८ वर्षाच्या पुलाच्या ऑडिटचं काम महापालिकेचे एक्झिक्यूटिव्ह इंजिनिअर ए. आर. पाटील यांच्या देखरेखी खाली झालं होतं. तर २०१३-१४ साली या पुलाच्या दुरूस्तीचं काम असिस्टंट इंजिनिअर एस.एफ. काकुळते यांच्या देखरेखीखाली झालं होतं. तसंच या कामाला महापालिकेचे निवृत्त इंजिनिअर एस. ओ. कोरी आणि त्यांचे असिस्टंट आर. बी. तारे यांनी मान्यता दिल्याचंही अहवालात म्हटलं आहे. 

या प्रकरणी कंत्राटदार आर. पी. एस. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीही तितकीच दोषी असल्याचं अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे महापालिकेनं या कंपनीला देखील कारणे दाखवा नोटीस पाठवत तिचं नाव काळ्या यादीत नोंदवलं आहे.

 दरम्यान, पुलाच्या दुरूस्तीबाबत चुकीची माहिती सादर केल्याप्रकरणी पोलिसांनी या पुलाच्या देखभालीचं काम एस.एफ काकुळते यांच्या देखरेखीखाली झाल्यानं त्यांना या प्रकरणात अटक केली आहे.  


हेही वाचा -

मुंबईत उमेदवारी अर्ज भरायला मंगळवारपासून सुरूवात

हार्बर मार्गावरील सेवा पूर्ववतसंबंधित विषय
ताज्या बातम्या