Advertisement

हार्बर मार्गावरील सेवा पूर्ववत

खांदेश्वर स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यानं सोमवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांचा खोळंबा झाला.

हार्बर मार्गावरील सेवा पूर्ववत
SHARES

खांदेश्वर स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यानं सोमवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांचा खोळंबा झाला. त्यातच पनवेलच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर हा प्रकार घडल्यानं दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर युद्ध पातळीवर ओव्हरहेड वायरच्या दुरूस्तीचं काम हाती घेण्यात आलं. यानंतर संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हे काम पूर्ण करण्यात आलं. त्यानंतर हार्बरची वाहतूक सुरळीत करण्यात आली.


प्रवाशांची गर्दी

सायंकाळी ४ च्या सुमारास ही घटना घडली. माहिती मिळाल्यानंतर रेल्वे प्रशासनानं युद्ध पातळीवर ओव्हरहेड वायर दुरूस्त करण्याचं काम सुरू केलं. हे काम पूर्ण होण्यासाठी दीड तासापेक्षा अधिक कालावधी लागल्यानं अनेक ट्रेन खोळंबल्या होत्या. तसंच पनवेल स्थानकावरही प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं पहायला मिळालं होतं. दोन दिवसांपूर्वी ट्रान्सहार्बर मार्गावरही कोपरखेरणे स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे ठाण्याकडे जाणाऱ्या लोकल ठप्प झाल्या होत्या.



हेही वाचा -

सेन्सेक्सचं नवं वर्ष स्वागत! गाठला ३९ हजारांचा पल्ला

जाणून घ्या व्हॉट्सअॅपमध्ये आलंय कोणतं नवं फिचर ?




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा