Advertisement

सेन्सेक्सचं नवं वर्ष स्वागत! गाठला ३९ हजारांचा पल्ला


सेन्सेक्सचं नवं वर्ष स्वागत! गाठला ३९ हजारांचा पल्ला
SHARES

आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने नवा उच्चांक गाठत ३९ हजारांचा टप्पा गाठला. मात्र दिवसअखेर सेन्सेक्सच्या अंकात घसरण होऊन तो ३८,८३७.१८ अंकावर थांबला. तर निफ्टीने ११.६५५.६० चा टप्पा गाठला. देशांतर्गत चलनाला आलेली मजबुती तसंच परदेशी गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे सेन्सेक्सने उसळी घेतली.


७ महिन्यांनी नवा उच्चांक

सोमवारी सकाळी शेअर बाजार सुरू होताच १०.१८ वाजता सेन्सेक्सने ३९ हजारावर उसळी घेत नवा विक्रम रचला. परंतु दिवसअखेर सेन्सेक्समध्ये घसरण झाली. तरीही सेन्सेक्स १६४.२७ अंकांनी वाढून ३८,८३७.१८ अंकांवर पोहोचला. तर निफ्टी ३१.७० अंकांची वाढ नोंदवून ११.६५५.६० वर पोहोचला. या आधी सेन्सेक्सने ९ ऑगस्ट २०१८ रोजी ३८ हजारांचा पल्ला गाठला होता.


'हे' शेअर्स वधारले

सेन्सेक्समध्ये टाटा मोटर्स, वेदांता लिमिटेड, टाटा स्टील, एलटी, आयसीआयसीआय बँक, एमअँडएम, भारती एअरटेल, एसीएल टेक, इन्फोसिस, हिरो मोटो कॉर्प,एसबायएन, मारुती टीसीएस, एशियन पेंट, हिंदुस्थान युनिलिव्हर, सन फार्मा, एचडीएफसी बँक, आयटीसी, बजाज ऑटो आणि रिलायन्सच्या शेअरांमध्ये तेजी बघायला मिळाली. तर अॅक्सिस बँक, पॉवर ग्रीड, येस बँक, कोटक बँक, इंड्सइंड बँक, एनटीपीसी, कोल इंडिया, ओएनजीसीच्या शेअर्समध्ये काही प्रमाणात घसरण झाली.



हेही वाचा-

१ हजार वैमानिकांचा संपाचा इशारा, जेटपुढील अडचणी वाढल्या



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा