जाणून घ्या व्हॉट्सअॅपमध्ये आलंय कोणतं नवं फिचर ?

व्हॉट्सअॅप म्हणजे आजकाल सर्वांच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग बनलं आहे. फेसबुकनं हे जाणून अॅप आपल्या ताब्यात घेतल्यापासून यामध्ये अनेक नव्या गोष्टींची भर पडली तर काही गोष्टींवर मर्यादाही आणली गेली.

  • जाणून घ्या व्हॉट्सअॅपमध्ये आलंय कोणतं नवं फिचर ?
  • जाणून घ्या व्हॉट्सअॅपमध्ये आलंय कोणतं नवं फिचर ?
  • जाणून घ्या व्हॉट्सअॅपमध्ये आलंय कोणतं नवं फिचर ?
SHARE

व्हॉट्सअॅप म्हणजे आजकाल सर्वांच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग बनलं आहे. फेसबुकनं हे जाणून अॅप आपल्या ताब्यात घेतल्यापासून यामध्ये अनेक नव्या गोष्टींची भर पडली तर काही गोष्टींवर मर्यादाही आणली गेली. काही महिन्यांपूर्वीच व्हॉट्सअॅपने फॉरवर्डेड मेसेजवर मर्यादा आणली होती. आता पुन्हा एकदा त्यामध्ये एक बदल करण्याचा निर्णय व्हॉट्सअॅापनं घेतला आहे. 


व्हॉट्सअॅपनं आणलेल्या नव्या फिचरमध्ये 'Forwarding Info' आणि 'Frequently Forwarded' यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे एखादा मेसेज किती वेळा फॉरवर्ड करण्यात आला आहे याची माहिती मिळणार आहे.


WABetaInfo या संकेतस्थळानं याबाबत माहिती दिली असून हे नवं फिचर आयओएस आणि एन्ड्रॉईड दोन्हीवर वापरता येणार आहे. सध्या यावर काम सुरू असून त्याचं बीटा व्हर्जन लॉन्च करण्यात आलं आहे.


इन्फो सेक्शनमध्ये  'Forwarding Info' हा पर्याय युजर्सना पाहता येणार आहे. त्यामुळं कोणता मेसेज किती वेळा फॉरवर्ड करण्यात आला हे युजरला पाहता येईल. तसंच या पर्यायाचा वापर करण्यासाठी संबंधित युजरला आपल्याला आलेला फॉरवर्डेड मसेज पुढं फॉरवर्ड करावा लागणार आहे. व्हॉट्सअॅतपचं 'Forwarding Info' आणि 'Frequently Forwarded' हे दोन्ही पर्याय सर्वांना कधी वापरता येतील याबाबत व्हॉट्सअॅपनं कोणतीही माहिती दिली नाही. परंतु लवकरच हे फिचर सर्वांसाठी उपलब्ध होईल, अशा चर्चा सध्या रंगत आहेत. 
 हेही वाचा - 

एप्रिल फूल नव्हे, नव्या आर्थिक वर्षातले 'कूल' बदल

मुंबईतील पायाभूत सोईंसाठी २.७५ लाख कोटी रुपये
संबंधित विषय
ताज्या बातम्या