वाहतूक पोलिसांच्या ई-चलानचा भोंगळ कारभार

या घटनेची गंभीर दखल घेत वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी घेत. या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

वाहतूक पोलिसांच्या ई-चलानचा भोंगळ कारभार
SHARES

गाडी मुंबईची चलान मात्र दिल्लीतील नागरिकाला...मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या ई-चलानचा भोंगळ कारभार पून्हा एकदा समोर आला आहे. दिल्लीतील एका तरुणाच्या मोबाइलवर वाहतूकीच्या नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी ई-चलानद्वारे दंड ठोठावला आहे. हा मेसेज पाहिल्यानंतर दिल्लीतीत तरुणाने ‘ माझी कोणतीही दुचाकी, चार चाकी वाहन नाही. तसेच मुंबई किंवा महाराष्ट्रात मी कधीही गेलेलो नाही़ परंतु तरीही मला मोबाइल क्रमांकावर मुंबई पोलिसांनी ई-चलनचा संदेश पाठविला असल्याची’ संतप्त प्रतिक्रिया मुंबई पोलिसांच्या ट्विटर पेजवर दिली आहे.

हेही वाचाः- 'हा' रेल्वे प्रकल्प महागला, प्रवासी नाराज

दिल्लीत राहणारा अंतर कुमार यांनी याबाबत ट्विट केले आहे़. त्या मोबाइल क्रमांकावर कोणतीही दुचाकी, चार चाकी वाहन नाही. तसेच मुंबई किंवा महाराष्ट्रात मी कधीही गेलेलो नाही़ परंतु तरीही मला मोबाइल क्रमांकावर मुंबई पोलिसांनी ई-चलनचा संदेश पाठविला असल्याचे कुमार यांनी नमूद केले. आपल्याला कोणत्या आधारावर ई-चलन आकारले आहे, असा सवाल कुमार यांनी ट्विटकरून मुंबई पोलिसांना विचारला आहे. ज्या व्यक्तीचे नाव वाहन चालक म्हणून लिहिले आहे ते नाव मी पहिल्यांदा ऐकले असून मी माझा मोबाइल क्रमांक ९ आॅगस्ट २०१२ पासून बदलला नाही. तर चूक कशी होऊ शकते?

हेही वाचाः-मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू २ जखमी

पोलिसांच्या या बेजाबदारपणामुळे कित्येक आरोपी सुटतात असे म्हणतं कुमार यांनी टिका केली.  या घटनेची गंभीर दखल घेत वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी घेत. या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या गाडीची कोणत्या तरी व्यक्तीने नोंदणी केली आहे़ त्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांक दाखविला आहे. दोन-तीन प्रकारे मोबाइल क्रमांकात चूक होऊ शकते. एक म्हणजे आरटीओ कार्यालयात गाडीची नोंदणी करताना, कधीकधी व्यक्ती मोबाइल क्रमांक पोर्ट करतात, जुनी गाडी एका व्यक्तीच्या नावे असते आणि दुसरा चालवतो. तसेच काही वेळा जाणीवपूर्वक व्यक्ती दुसऱ्याचा मोबाइल क्रमांकावर गाडीची नोंदणी करतात. अनेक कारवाईतून पुढे आले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा