Advertisement

'हा' रेल्वे प्रकल्प महागला, प्रवासी नाराज

मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे-दिवा पाचवी साहावी मार्गिका मागील अनेक वर्षांपासून रखडली आहे.

'हा' रेल्वे प्रकल्प महागला, प्रवासी नाराज
SHARES

मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे-दिवा पाचवी साहावी मार्गिका मागील अनेक वर्षांपासून रखडली आहे. ही मार्गिरा रखडल्यानं आता या प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. ही वाढ ५० टक्क्यांनी वाढ झाली असून, खाडीतील खारफुटीच्या परिसरातील कामं आणि भूसंपादनास झालेल्या विलंबाचा फटका प्रकल्पाला बसत आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत लोकल आणि मेल-एक्स्प्रेससाठी स्वतंत्र मार्गिका निर्माण करण्या येणार आहे. मात्र, खर्चात वाढ झाल्यानं २८७ कोटींचा प्रकल्प सध्या ५०२ कोटींपर्यंत पोहचला आहे.

मार्गिका उभारण्याचं काम

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) मुंबई शहरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) २ ब अंतर्गत ठाणे-दिवा पाचवी सहावी मार्गिका उभारण्याचं काम सुरू आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाचा खर्च जाणून घेण्यासाठी माहिती मागविण्यात आली होती. त्यावेळी ठाणे-दिवा रेल्वे प्रकल्पाची किंमत ५०२.३६ कोटींपर्यंत पोहचली आहे. त्यापैकी ४६४.७३ कोटी खर्च झाले आहे. हा प्रकल्प जून २०२०-२१पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


विलंबानं परवानगी

ठाणे-दिवा दरम्यान खाडीतील खारफुटी परिसरात काम करण्याची परवानगी विलंबानं मिळाली. त्यामुळं या भागात प्रत्यक्ष काम सुरू करण्यास उशीर झाला. तसंच, बरोबर प्रकल्पातील काही भागातील भूसंपादन रखडल्यानं प्रकल्प लांबल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळानं दिली आहे.


स्वतंत्र मार्गिका

सद्यस्थितीत लोकमान्य टिळक टर्मिनस ते ठाणे या मार्गावर लोकल आणि मेल-एक्स्प्रेससाठी स्वतंत्र मार्गिका आहे. त्याच बरोबर दिवा-कल्याण दरम्यान पाचवा-सहावा मार्ग आहे. मात्र, ५० लोकल फेऱ्या वाढवण्याची क्षमता असलेला हा महत्त्वाचा प्रकल्प रखडल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.



हेही वाचा -

रायगडाच्या विकासासाठी २० कोटी मंजूर, मुख्यमंत्र्यांची घोषणा

रिलायन्स इंडस्ट्रीजने रचला 'हा' नवा इतिहास



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा