रिलायन्स इंडस्ट्रीजने रचला 'हा' नवा इतिहास

देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (आरआयएल) पुन्हा एकदा इतिहास रचला आहे.

SHARE

देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (आरआयएल) पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर बाजारात दहा लाख कोटी रुपयांची मार्केट कॅप (बाजार भागभांडवल) असलेली देशातील पहिली कंपनी बनली आहे. रिलायन्सने सकाळी १०.०८ मिनिटांनी हा इतिहास रचला.

रिलायन्स इंडस्ट्रीजला अनेक दिवसांपासून भारतीय शेअर बाजाराच्या तेजीचा मोठा फायदा झाला आहे. गुरुवारी सकाळी १०.८ वाजता बीएसईवर रिलायन्सचा शेअर ०.६३ टक्क्यांनी वधारून १५७९.७० रुपयांवर पोचला. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भागभांडवल १० लाख कोटी रुपयांच्या वर जाऊन १० लाख १ हजार ४९२.०३ कोटी रुपयांवर पोचले. 

गुरुवारी बाजार भागभांडवलाशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीजनेही बीएसईवर शेअर्स किंमतीच्या बाबतीत विक्रम नोंदविला. रिलायन्सचा शेअर बीएसईवर प्रति शेअर १५८१.२५ रुपयांवर पोचून एक वर्षाच्या उच्चांकी पातळी नोंदवली. मागील आठवड्यात रिलायन्सच्या शेअर्सने ५२ आठवड्यांचा नवा विक्रम नोंदविला होता.हेही वाचा -

नोकियाचा स्मार्ट टीव्ही 'ह्या' दिवशी होणार लाँच

सेन्सेक्स प्रथमच ४१ हजारांवरसंबंधित विषय
ताज्या बातम्या