नोकियाचा स्मार्ट टीव्ही 'ह्या' दिवशी होणार लाँच

नोकियाचा स्मार्ट टीव्ही Android 9 वर आधारित बेस्ड प्रोप्रायटरी ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणार आहे. तसंच हा टीव्ही गुगल प्ले स्टोरच्या अॅक्सेससह येणार आहे.

SHARE

स्मार्टफोन बनवणारी कंपनी नोकिया आता आपला स्मार्ट टीव्ही भारतीय बाजारात आणत आहे. ५ डिसेंबरला नोकिया स्मार्ट टीव्ही लाँच करणार आहे.  हा टीव्ही फ्लिपकार्टवर एक्सक्लुझिव्ह पद्धतीने उपलब्ध होणार आहे.

 नोकियाचा स्मार्ट टीव्ही Android 9 वर आधारित बेस्ड प्रोप्रायटरी ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणार आहे. तसंच हा टीव्ही गुगल प्ले स्टोरच्या अॅक्सेससह येणार आहे. टीव्हीचा डिस्प्ले ५५ इंचांचा असून हा डिस्प्ले 4K अल्ट्रा HD सपोर्टसह आहे. या टीव्हीत मिनिमल हार्मोनिक डिस्टॉर्शन आणि चांगल्या दर्जेदार आवाजासाठी क्लिअर व्होकल टोन्स असतील. क्वालिटी ऑडिओ प्ले बॅकसाठी टीव्हीत फ्रंट स्पीकर्समध्ये DTS TruSurroung आणि डॉल्बी ऑडिओ असणार आहे.

फ्लिपकार्टने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केलं आहे की,  नोकियाचा हा स्मार्ट टीव्ही खास स्पीकर्ससह येणार आहे.  हे स्पीकर्स जेबीएल साउंड प्रोग्रामवर काम करणार आहेत.  या स्मार्ट टीव्हीची किंमत काय असेल हे मात्र अद्याप उघड झालेलं नाही.हेही वाचा -

२७ मिनिटांत इस्त्रो लाँच करणार १४ उपग्रह

कंकणाकृती सूर्यग्रहण २६ डिसेंबरला भारतातून दिसणार

संबंधित विषय
ताज्या बातम्या