Advertisement

कंकणाकृती सूर्यग्रहण २६ डिसेंबरला भारतातून दिसणार

दुर्मीळ समजले जाणारे कंकणाकृती सूर्यग्रहण एक महिन्याने भारतातून दिसणार आहे.

कंकणाकृती सूर्यग्रहण २६ डिसेंबरला भारतातून दिसणार
SHARES

दुर्मीळ समजले जाणारे कंकणाकृती सूर्यग्रहण एक महिन्याने भारतातून दिसणार आहे. सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ तामिळनाडू येथील काही भागांतून गुरुवार २६ डिसेंबर रोजी दिसणार आहे. याआधी ९ वर्षांपूर्वी १५ जानेवारी २०१० रोजी सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती भारतातून दिसली होती.

आता २६ डिसेंबरला होणारे हे सूर्यग्रहण उर्वरित भारतात खंडग्रास स्थितीत दिसेल, असं खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. सोमण म्हणाले की, खग्रास सूर्यग्रहणात चंद्रबिंब संपूर्ण सूर्यबिंबाला झाकून टाकते. परंतु जर त्या वेळी चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब लहान दिसत असल्याने सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही. अशावेळी सूर्याची वर्तुळाकार कडा दिसते, त्याला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात.

सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी न पाहता चष्म्याचा वापर करावा, असं सोमण यांनी सांगितलं. मुंबई येथे सकाळी ८.०४ ते १०.५५ या वेळेत तर, पुणे येथून ८.०५ ते १०.५८ या वेळेत हे ग्रहण दिसेल. यानंतर पुढच्या वर्षी २१ जून २०२० रोजी होणाºया सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती राजस्थान, पंजाब, हरयाणा आणि उत्तराखंडमधील काही प्रदेशातून दिसणार आहे.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा