Advertisement

२७ मिनिटांत इस्त्रो लाँच करणार १४ उपग्रह

एकप्रकारे भारत इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. भारताच्या पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (PSLV) रॉकेटमधून १४ उपग्रह २७ नोव्हेंबरला अवकाशात पाठवले जातील.

२७ मिनिटांत इस्त्रो लाँच करणार १४ उपग्रह
SHARES

भारतीय अवकाश संशोधन संस्था २७ नोव्हेंबरला २७ मिनिटांत १४ उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. एकप्रकारे भारत  इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. भारताच्या पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल म्हणजेच पीएसएलव्ही रॉकेटमधून १४ उपग्रह २७ नोव्हेंबरला अवकाशात पाठवले जातील.


२७ मिनिटांत १४ उपग्रह

आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा पॅडमधून सकाळी ९.२८ वाजता अवघ्या २७ मिनिटांत इस्रो हे उपग्रह अवकाशात पाठवणार आहे. यात भारताचा १ हजार ६२५ किलो कार्टोसॅट उपग्रह असेल, तर अमेरिकेचे १३ नॅनो उपग्रह यामध्ये पाठवले जातील. उड्डाणाच्या पहिल्या १७ मिनिटांत पीएसएलव्ही रॉकेट प्रथम पाच वर्षे काम करणाऱ्या कार्टोसॅटला कक्षेत स्थापन करेल.


अंतराळातून देखरेख

कार्टोसॅट -३ हा प्रगत उपग्रह आहे, ज्यामध्ये हाय-रिझोल्यूशन इमेजिंग क्षमता आहे. हा उपग्रह भारताच्या सीमांना अंतराळातून देखरेख करण्यासही मदत करेल. हा ९७.५ अंशांच्या झुकावर ९० किमीच्या कक्षात ठेवला जाईल. हा उपग्रह शहरी नियोजन, किनारपट्टी जमीन वापर, पायाभूत सुविधा विकास, जमीन कवच इत्यादी गोष्टींसाठी उच्च गुणवत्तेची छायाचित्रे देईल. त्यानंतर सुमारे एक मिनिटानंतर, १३ अमेरिकन नॅनो उपग्रहांपैकी एक कक्षेत ठेवला जाईल


२ सॅटेलाईट लाँच करणार

इस्रो दोन अन्य सर्विलियन्स सॅटेलाईट लाँच करणार आहे. रीसॅट-२ बीआर आणि रीसॅट-२ बीआर २ अशी त्यांची नावं आहेत. हे दोन्ही पीएसएलवीसी ४८ आणि ४९ च्या मदतीनं डिसेंबर महिन्यात श्रीहरिकोटा इथून लाँच करण्यात येईल. यापूर्वी इस्रोनं ११ मे ला रीसॅट-२ बी आणि १ एप्रिलमध्ये ईएमआयसॅट लाँच केले होते.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा