Advertisement

सेन्सेक्स प्रथमच ४१ हजारांवर

आधी ४० हजारांची विक्रमी पातळी गाठल्यानंतर आता ४१ हजारावर सेन्सेक्स गेला आहे.

सेन्सेक्स प्रथमच ४१ हजारांवर
SHARES

शेअर बाजारासाठी मंगळवारचा दिवस एेतिहासिक ठरला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने प्रथमच ४१ हजारांचा टप्पा ओलांडला. मंगळवारी सकाळी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स वधारून ४१,०२२.८५ वर उघडला. प्रथमच ४१ हजारांच्या वर जात सेन्सेक्सने नवा विक्रम केला आहे.

सेन्सेक्ससह निफ्टीनेही विक्रम केला आहे. निफ्टीही १२ हजारांच्या वर गेला आहे. निफ्टी सकाळी १२,११०.२० अंकावर उघडला. मागील काही महिन्यांपासून सेन्सेक्सची विक्रमी वाटचाल सुरू आहे. आधी ४० हजारांची विक्रमी पातळी गाठल्यानंतर आता ४१ हजारावर सेन्सेक्स गेला आहे. अमेरिका, चीन यांच्यातील व्यापर संबंध सुधारण्याच्या अपेक्षा उंचावल्याने आशिया बाजार तेजीत आहेत. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला.  

 चीन, जपान, कोरिया या देशांमधील शेअर बाजारातील सकारात्मक परिणाम भारतीय बाजारावर झाला आहे. मंगळवारी आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, ओएनजीसी, सन फार्मा आदी शेअर्समध्ये चांगली वाढ झाली. तर भारती एअरटेल, पाॅवरग्रीड, बजाज ऑटो, अॅक्सिस बँक,  एलअँडटी आदी शेअर्समध्ये घसरण झाली.हेही वाचा-

बंद मोबाइल क्रमांकाची माहिती द्या; दूरसंचार कंपन्यांना ट्रायचे निर्देश

विद्यार्थी क्रेडिट कार्डचे 'हे' आहेत फायदे
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा