Advertisement

विद्यार्थी क्रेडिट कार्डचे 'हे' आहेत फायदे

तंत्रज्ञानाच्या या युगात बहुतेक विद्यार्थी डिजिटल वॉलेट्स, क्रेडिट कार्ड्स आणि डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देतात. आज बऱ्याच बँका आणि क्रेडिट कार्ड कंपन्या विद्यार्थ्यांना क्रेडिट कार्ड देत आहेत.

विद्यार्थी क्रेडिट कार्डचे 'हे' आहेत फायदे
SHARES

तंत्रज्ञानाच्या या युगात बहुतेक विद्यार्थी डिजिटल वॉलेट्स, क्रेडिट कार्ड्स आणि डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देतात. आज बऱ्याच बँका आणि क्रेडिट कार्ड कंपन्या विद्यार्थ्यांना क्रेडिट कार्ड देत आहेत. रोख पैसे ठेवण्यापेक्षा क्रेडिट कार्ड बाळगणं खूप सोपे आणि तणावमुक्त आहे. कारण चोरी झाल्यास क्रेडिट कार्ड बंद केले जाऊ शकते. अशा स्टुडंट क्रेडिट कार्डविषयी काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात

कोण अर्ज करू शकतो

  • क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्याचं वय १८ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असावे.
  • क्रेडिट कार्ड शालेय विद्यार्थ्यांना मिळत नाही
  • महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाच क्रेडिट कार्ड मिळते.
  • अर्ज करताना महाविद्यालयीन ओळखपत्रासारखा पुरावा आवश्यक अाहे.
  • अनेक बँका फक्त शैक्षणिक कर्ज घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रेडिट कार्ड देतात.
  • बँकेकडे निश्चित ठेव असल्यास बँक अशा विद्यार्थ्यांना क्रेडिट कार्ड देतात.
  • जर कुटुंबातील एखाद्याच्या नावावर क्रेडिट कार्ड असेल तर ते विद्यार्थ्याच्या नावे अ‍ॅड ऑन कार्डसाठी अर्ज करू शकतात. 
  • विद्यार्थ्याचे बचत खाते असल्यास क्रेडिट कार्ड मिळते.

आवश्यक कागदपत्रे

  • जन्म प्रमाणपत्र
  • महाविद्यालय / विद्यापीठाचे ओळखपत्र
  • पत्ता पुरावा
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • पॅन कार्ड

विद्यार्थी क्रेडिट कार्डची वैशिष्ट्ये

  • विद्यार्थी क्रेडिट कार्डची मर्यादा १५ हजार रुपयांपर्यंत आहे.
  • विद्यार्थी क्रेडिट कार्डची वैधता ५ वर्षे आहे.
  • या क्रेडिट कार्डसाठी अनेकदा जॉईन फी आकारली जात नाही. वार्षिक फी पण खूप कमी असते.
  • जर कार्ड हरवले किंवा चोरी झाले असेल तर डुप्लिकेट कार्डसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

क्रेडिट कार्डचे फायदे

  • उत्पन्नाचा पुरावा आवश्यक नसतो. आणि फारच कमी कागदपत्रेही आवश्यक असतात.
  • विद्यार्थी क्रेडिट कार्डवर अनेक प्रकारचे कॅशबॅक, सवलत आणि इतर ऑफर मिळतात.
  • विद्यार्थी क्रेडिट कार्डचा वापर करून पेट्रोल आणि डिझेल देऊन काही पैसे वाचवू शकतात.
  • क्रेडिट कार्डच्या मदतीने फी भरली जाऊ शकते. तसंच पुस्तके आणि स्टेशनरीही खरेदी करता येते



हेही वाचा -

मोफत नाही मिळत क्रेडिट कार्डची सेवा, बँका आकारतात 'हे' शुल्क




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा