Advertisement

मोफत नाही मिळत क्रेडिट कार्डची सेवा, बँका आकारतात 'हे' शुल्क

अनेकदा वाटते की क्रेडिट कार्ड फायदेशीर आहे. मात्र, बँक क्रेडिट कार्डची कोणतीच सेवा मोफत देत नाही. यासाठी अनेक शुल्क आकारते. बँक क्रेडिट कार्ड कोणते शुल्क आकारतात याची माहिती आपण घेऊयात.

मोफत नाही मिळत क्रेडिट कार्डची सेवा, बँका आकारतात 'हे' शुल्क
SHARES

आजच्या काळात क्रेडिट कार्ड हे एक महत्त्वपूर्ण साधन बनले आहे. एखादी वस्तू खरेदी करायची असेल किंवा तिकिट बुक करायचे असेल तर लोक क्रेडिट कार्डच वापरतातक्रेडिट कार्ड एखाद्या मर्यादेपर्यंत फायदेशीर असते. मात्र, त्यानंतर त्याचा वापर अनेकदा होण्यास सुरूवात होते तेव्हा त्याचं बीलही तेवढंच मोठ्या प्रमाणावर येते. अनेकदा वाटते की क्रेडिट कार्ड फायदेशीर आहे. मात्र, बँक क्रेडिट कार्डची कोणतीच सेवा मोफत देत नाही. यासाठी अनेक शुल्क आकारते. बँक क्रेडिट कार्ड कोणते शुल्क आकारतात याची माहिती आपण घेऊयात.

वार्षिक देखभाल शुल्क

वार्षिक देखभाल शुल्क हे दरवर्षी आकारले जाते. जेव्हा एखाद्या व्यक्तीस क्रेडिट कार्ड विनामूल्य दिले जाते, म्हणजे जॉइनिंग फी आणि वार्षिक शुल्क काढून माफ केलेले असते. मात्र, हे शुल्क एका निश्चित कालावधीसाठी काढून टाकलेले असते.

जीएसटी

क्रेडिट कार्डमधून होणाऱ्या सर्व व्यवहारांवर जीएसटी आकारला जातो. प्रत्येक व्यवहारावर निश्चित दराने जीएसटी लावला जातो.


ओव्हरड्राफ्ट शुल्क

प्रत्येक क्रेडिट कार्डधारकाला एका ठराविक मर्यादेपर्यंत कर्ज मिळते. प्रत्येक कार्डधारकाची वेगवेगळी मर्यादा असते. जेव्हा कार्डधारक त्याच्या कार्डाच्या मर्यादेपेक्षा जास्त कर्ज घेतो तेव्हा ओव्हरड्राफ्ट शुल्क क्रेडिट कार्डवर लागू होते.

व्याज

क्रेडिट कार्डच्या दर महिन्याच्या बिलावर जी पूर्ण रक्कम दाखवली जाते ते बिल आपल्याला भरावे लागते. त्याचबरोबर कमीत कमी शुल्काचा उल्लेख असतो. हे कमीत कमी भरावेच लागते. बहुतेक लोक किमान रक्कम देण्यास प्राधान्य देतात. कारण त्यांना वाटते की उर्वरित रक्कम नंतर सहजपणे देता येईल. मात्र, यामुळे आपण आणखी कर्जात अडकू शकतो. कारण बँका या रकमेवर व्याज लावतात.

एटीएममधून पैसे काढण्यावर शुल्क

ग्राहकांना त्यांच्या क्रेडिट कार्डचा वापर करून एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा दिली जाते. मात्र, एटीएममधून पैसे काढणं फारच महागात जाते. या पैशावर बँका मोठे व्याज आकारतात. साधारणपणे दिवसाला अडीच टक्के व्याज आकारलं जातं.हेही वाचा -

बँक येणार तुमच्या दारात, घरबसल्या मिळणार बँकिंग सुविधा

२ हजाराची नोट होणार बंद, 'हे' आहे कारण

संबंधित विषय
Advertisement