Advertisement

२ हजाराची नोट होणार बंद, 'हे' आहे कारण

२०१६ मध्ये केंद्र सरकारनं नोटाबंदी केली. काळ्या पैशाला चाप लावण्यासाठी ५०० आणि १००० रुपयांची नोट बंद करण्यात आली. त्यानंतर प्रथमच २ हजार रुपयांची नोट चलनात आणली होती.

२ हजाराची नोट होणार बंद, 'हे' आहे कारण
SHARES

लवकरच २ हजार रुपयांची नोट बंद होणार आहे. रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांच्या नोटेची छपाई थांबवली आहे. चालू आर्थिक वर्षात २००० रुपयांची एक नोटही छापली गेली नसल्याचं माहिती अधिकारातून उघड झालं आहे.

 माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आरबीआयनं २ हजार रुपयांच्या नोटेची छपाई करणं थांबवलं असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे लवकरच ही नोट चलनातून हद्दपार होईल. आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये २००० रुपयांच्या ३५४.२९ कोटी नोटा छापण्यात आल्या. तर २०१७-१८ मध्ये ११.१५ कोटी आणि २०१८-१ ९मध्ये ४.६६ कोटी नोटा छापल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे. 

२०१६ मध्ये केंद्र सरकारनं नोटाबंदी केली. काळ्या पैशाला चाप लावण्यासाठी ५०० आणि १००० रुपयांची नोट बंद करण्यात आली. त्यानंतर प्रथमच २ हजार रुपयांची नोट चलनात आणली होती. यावरून केंद्र सरकार आणि आरबीआयवर टीकाही झाली होती. २ हजाराच्या नोटेमुळे सुट्टया पैशांची समस्या वाढेल. तसंच पुन्हा काळा पैसा वाढेल, असं मत व्यक्त करण्यात आलं होतं. २०१८-१९ मध्ये चलनातील २ हजार रुपयांच्या नोटा ७.२ कोटींनी कमी झाल्या आहेत. हेही वाचा -

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा