JIO चा दणका, फूल टॉक टाइम बेनिफिट बंद

रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना आता एकापाठोपाठ धक्के देत आहे. आधी आऊटगोईंग काॅलवर शुल्क आकारून मोठा धक्का जिओने दिला होता.

SHARE

 रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना आता एकापाठोपाठ धक्के देत आहे. आधी आऊटगोईंग काॅलवर शुल्क आकारून मोठा धक्का जिओने दिला होता. तर आता प्रीपेड रिचार्ज प्लानवर मिळणारं फुल टॉक टाइम बेनिफिटही जिओने बंद केलं आहे. जिओच्या ग्राहकांसाठी हा मोठा झटका आहे. 

जिओने सुरूवातीपासून माफक किमतीत चांगले प्लान्स दिले होते. त्यामुळे जिओकडे ग्राहकांचा अधिक ओढा होता. मागील आठवड्यात जिओने इतर नेटवर्कवरील कॉलसाठी ग्राहकांकडून प्रति मिनिट ६ पैसे आकारण्यास सुरूवात केली. हा  ग्राहकांसाठी मोठा इटका होता. आता जिओने दुसरा मोठा धक्का दिला आहे. फुल टाॅक टाईम देणं जिओने बंद केले आहे. 

जिओच्या १० ते १००० रुपयांदरम्यान टॉकटाइम योजना आहेत. या योजनांवर आता फुल टाॅकटाईम मिळणार नाही. आता जिओच्या १० रुपयांच्या टॉकटाइम रिचार्जमध्ये ७.४७ रुपयांचा टॉकटाइम मिळणार आहे.   २० रुपयांच्या रिचार्जमध्ये १४.९५ रुपये, ५० रुपयांत ३९.३७ रुपये, १०० रुपयात ८१.७५ रुपये, ५०० मध्ये ४२०.७३ रुपये आणि १००० रुपयांच्या योजनेत ८४४.४६ रुपये टॉकटाइम मिळणार आहे.


हेही वाचा -

बीएसएनएल व एमटीएनएल कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात

पीएमसी बँकेच्या ग्राहकांना दिलासा, पैसे काढण्याची मर्यादा वाढलीसंबंधित विषय
ताज्या बातम्या