महानगर टेलिफोन निगम लिमिटेडचे (एमटीएनएल) मुंबई व दिल्लीतील कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेला नाही. मागील २ महिने हे कर्मचारी वेतनापासून वंचित आहेत. तसंच, दिवाळीही तोंडावर असताना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचं वेतन कधी मिळणार, याबाबत व्यवस्थापनाकडून अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळं कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसण्याच्या तयारीत आहेत.
'बीएसएनएल'नंतर 'एमटीएनएल' कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तसंच, तो मंजुरीसाठी दूरसंचार विभागाकडं पाठविण्यात आला आहे. परंतु, त्यावेळी या कर्मचाऱ्यांच्या २ महिन्यांच्या प्रलंबित वेतनाबाबत दूरसंचार विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. त्यामुळं स्वेच्छानिवृत्ती योजना जारी झाली तरी वेतनाचं काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
हेही वाचा -
मुलगी पळून गेल्याच्या दुखातून बापाची आत्महत्या
PMC बँकेप्रकरणी केंद्राकडे पाठपुरावा करणार- फडणवीस